मुक्तपीठ टीम
दक्षिण आफ्रिकेत सापडलेला ओमिक्रॉन व्हेरिएंट १३ देशांमध्ये पोहोचला आहे. या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन इस्त्रायल पाठोपाठ जपानने सोमवारी परदेशी प्रवाशांसाठी प्रवासबंदीची घोषणा केली आहे. भारत सरकारने ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये ओमिक्रॉन प्रभावित देशांतील प्रवाशांना भारतात पोहोचताच अनिवार्य कोरोना तपासणीसह सात दिवस होम क्वारंटाईन राहावे लागेल. पण पण कोरोनाच्या भारतात फैलावासाठी परदेशी विमानांना प्रवेशबंदी उशिरा लावणेही एक कारण ठरले होते, त्यामुळे जपानसारखे पाऊल भारत कधी उचलणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी म्हटले आहे की, सर्वात वाईट परिस्थिती टाळण्यासाठी मंगळवारपासून खबरदारी म्हणून जपानने परदेशी प्रवाशांसाठी प्रवासबंदी केली आहे. पंतप्रधानांनी याचे वर्णन तात्पुरते आणि असाधारण उपाय म्हणून केले, जे सुरक्षेसाठी आवश्यक आहे. ओमिक्रॉनबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती मिळेपर्यंत हे उपाय आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सर्व सदस्य देशांना चेतावणी दिली आहे की ओमिक्रॉनचे काही क्षेत्रांमध्ये गंभीर परिणाम होऊ शकतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचा प्रसार होण्याची शक्यता आहे.
त्याच वेळी, ब्रिटनने सोमवारी सांगितले की, ते शक्तिशाली देशांच्या जी-७ गटाच्या आरोग्य मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावत आहे. यासोबतच ब्रिटनने सांगितले की, ओमिक्रॉनच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने ते लसीचे बूस्टर डोस देण्याच्या कार्यक्रमास पुढे जाण्यास तयार आहे.
या देशांनी उचलेली कठोर पावलं
- दुसरीकडे, सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीमधील लसीकरणावर आधारित प्रवास सुविधा काही काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
- यापूर्वी इस्रायलने रविवारी मध्यरात्रीपासून ही बंदी लागू केली होती.
- ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, ज्यांनी दक्षिण आफ्रिकन देशांवर प्रवास निर्बंध लादले आहेत.
- १ डिसेंबरपासून कुशल स्थलांतरित आणि विद्यार्थ्यांसाठी सीमा पुन्हा उघडण्याच्या योजनांचा राष्ट्रीय सुरक्षा बैठकीनंतर आढावा घेतला जाईल.
- भारताने बुधवारपासून सर्व विमानतळांवर जोखीम असलेल्या देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी कोरोना चाचण्यांचे आदेश दिले आहेत.
लसीकरण जलद करण्यासाठी सल्ला
- डब्ल्यूएचओ सदस्यांना उच्च प्राधान्य गटांचे लसीकरण जलद करण्यास आणि अत्यावश्यक आरोग्य सेवांमध्ये प्रवेश राखण्याचे आवाहन करते.
- अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थचे संचालक डॉ. फ्रान्सिस कॉलिन्स यांनी सांगितले की, कोरोनाच्या पूर्वीच्या कोणत्याही प्रकारापेक्षा ओमिक्रॉनमुळे अधिक गंभीर आजार होऊ शकतो, असे सूचित करणारा कोणताही डेटा अद्याप उपलब्ध नाही.
- तथापि, त्याच्या जलद प्रसाराच्या संभाव्यतेकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही.
- “डेल्टाच्या तुलनेत ते किती धोकादायक आहे हे आम्हाला माहित नाही,” कॉलिन्स म्हणाले.
- सध्या, लसीकरण, बूस्टर डोस, शारीरिक अंतर आणि मास्क यासारख्या उपायांवर अधिक भर दिला पाहिजे.
या देशांमध्ये आतापर्यंत ऑमिक्रॉनचे रुग्ण सापडलेत
- स्कॉटलंड
- पोर्तुगाल
- ऑस्ट्रेलिया
- बेल्जियम
- बोत्सवाना
- ब्रिटन
- कॅनडा
- डेन्मार्क
- फ्रान्स
- जर्मनी
- हाँगकाँग
- इस्रायल
- इटली
- नेदरलँड
- दक्षिण आफ्रिका