संतोष शिंदे / व्हा अभिव्यक्त!
महाराष्ट्रात तरुणांचं वैचारिक कॅडर बेस संघटन म्हणून संभाजी ब्रिगेड’कडे पाहिलं जातं. आजपर्यंत संभाजी ब्रिगेडने हजारो वैचारिक कार्यकर्ते घडवून मुख्य प्रवाहात आणले. त्या सर्वांचे वैचारिक मंथन झाले पाहिजे. मंगळवार दि. ३० नोव्हेंबर २०२१ रोजी संभाजी ब्रिगेडचा वर्धापन दिन येत आहे. या निमित्त कार्यकर्त्यांमध्ये स्वतःच्या नेतृत्वाची आणि प्रबोधनाच्या माध्यमातून सामाजिक, राजकीय क्रांती निर्माण करण्याची भावना वर्धापन दिनाच्या निमित्ताने जागृत करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबईच्या वांद्रे पश्चिम येथील ‘रंगशारदा सभागृहात दुपारी २ वाजता राज्यस्तरीय महामेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. समृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी सामाजिक आणि राजकीय क्रांतीच्या दिशेने संभाजी ब्रिगेडचे कॕडर बेस आणि संघटनात्मक पाऊल यापुढे पडणार आहे.
प्रबोधन, संघटन आणि महाराष्ट्राच्या प्रश्नावर आक्रमकपणे आवाज उठवण्यासाठी पुढील दिशा ठरणार आहे. आम्ही राजकारणात नवीन असलो तरी राजकीय क्रांती करण्यासाठी तयार आहोत. यासाठी नेतृत्वाने दोन ते तीन महिन्यात संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. म्हणून महाराष्ट्राला सक्षम पर्याय देण्याची घोषणा मुंबई मध्ये होणार आहे. यासाठी शंभर टक्के समाजकारण आणि शंभर टक्के राजकारण हे ब्रीद घेऊन संभाजी ब्रिगेड आक्रमकपणे पुढे जाणार आहे.
संभाजी ब्रिगेड वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय महामेळाव्यात मराठा व ओबीसींच्या आरक्षणावर चर्चा होणार आहे. ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, ही संभाजी ब्रिगेडच्या ची प्रमुख मागणी आहे. मराठा आरक्षण प्रश्न अजून प्रलंबीत आहे. धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण देण्याची राज्य सरकारची इच्छाशक्ती नाही. आरक्षणाच्या मुद्द्यावर सगळ्या समाजाला फक्त झुलवत ठेवण्याचं काम महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार करत आहे. यांच्यामुळेच महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षण रद्द झाले. राज्यात कष्टकरी, कामगार आणि छोट्या मोठ्या उद्योग व्यवसायांना उद्ध्वस्त करणारी धोरण सरकार राबवत आहे. एसटी कामगारांचा शासकीय सेवेत विलीनीकरण करण्याचा मुद्दा महत्त्वाचा असताना जाणीपूर्वक त्यांना त्रास देऊन आंदोलन संपवण्याचे काम राज्य सरकार करत आहे. निलंबन अथवा बडतर्फीची हा पर्याय नाही. म्हणूनच ४० लोकांनी कामगारांनी आत्महत्या केली. एसटी कामगारांचा गिरणी कामगार होऊ देणार नाही. सुशिक्षित बेरोजगारांच्या नोकरीचा प्रश्न महत्त्वाचा असतानासुद्धा सरकार बोगस कंपनीच्या माध्यमातून परीक्षा घेत आहे. नौकर भरती करण्याची इच्छाशक्ती सरकारमध्ये नाही. शेतकऱ्यांना अतिवृष्टी मध्ये झालेल्या नुकसानाची भरपाई अजून मिळालेले नाही. उलट सरकार भ्रष्टाचारामध्ये बरबटलेले आहे. या व अशा अनेक प्रश्नावर संभाजी ब्रिगेडचे सन्माननीय नेतेमंडळी प्रामुख्याने आवाज उठवणार आहेत.
सदर मेळाव्यास संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॕड. मनोज आखरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून या मेळाव्यास महासचिव सौरभ खेडेकर, प्रदेश कार्याध्यक्ष सुधीर देशमुख, डॉ. गजानन पारधी, संतोष गाजरे, प्रेमकुमार बोके आदी राज्यातील प्रमुख नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. इतिहास संशोधक प्रसिद्ध लेखक व संभाजी ब्रिगेडचे मुख्य प्रवक्ते मा. गंगाधर बनबरे यांचा अभ्यासपूर्ण व्याख्यान या मेळाव्यात आकर्षणाचे असेल. सदर मेळाव्याचे नियोजन संभाजी ब्रिगेड मुंबई प्रदेश पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी केले आहे.
“महाराष्ट्रात सुडबुद्धीचे राजकारण सुरू आहे. सत्ता टिकवण्यासाठी सत्ताधारी संघर्ष करत आहे तर सरकारचे लचके तोडण्यासाठी विरोधक प्रयत्न करत आहेत. यामध्ये सर्व सामान्यांचे प्रमुख प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. संभाजी ब्रिगेड हे खपवून घेणार नाही. वेळ पडली तर राजकीय संघर्ष करण्यासाठी संभाजी ब्रिगेड ला आक्रमकपणे महाराष्ट्राचे प्रबोधन करण्यासाठी आणि राज्याच्या समृद्ध विकासासाठी रस्त्यावर उतरावे लागेल. महाराष्ट्राच्या विकासासाठी संभाजी ब्रिगेडला आपला ‘तिसरा डोळा’ उघडावा लागेल. कारण सत्ताधारी मंडळी आणि विरोधक हे कुचकामी ठरलेले आहेत. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना सत्तेचा वाटा मिळण्यासाठी राजकीय तडजोड करून पुढील वाटचाल करण्याचा संकल्प या मेळाव्यात होणार आहे. येणारी स्थानिक स्वराज्या च्या निवडणुका संभाजी ब्रिगेड साठी सुवर्ण संधी असून यामध्ये जिल्ह्याजिल्ह्यात सत्ता संपादन मेळावा घेण्याचा संकल्प आहे. महाराष्ट्राचे चित्र बदलण्यासाठी सर्वांनी या मेळाव्यास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे…” अशी विनंती संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केली आहे.
पुण्यातून शेकडो कार्यकर्ते मुंबईतील संभाजी ब्रिगेड च्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित राहणार आहेत. सर्व कार्यकर्त्यांचे नियोजन संभाजी ब्रिगेड पुणे शाखेच्या वतीने करण्यात आलेले आहे. वैचारिक सोनं वर्धापन दिनानिमित्त लुटण्यात येणार आहे. म्हणून जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी मुंबई तील वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे. पुण्यातून जाण्याचे नियोजन संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे, महानगराध्यक्ष अविनाश मोहिते, जि. उपाध्यक्ष महादेव मातेरे, अजय माने, नितीन वाघेरे, संदीप कारेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे.
‘संभाजी ब्रिगेड वर्धापन दिन’ मेळाव्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन व विनंती.
लेखक संतोष शिंदे हे संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्रचे प्रदेश संघटक आहेत.
संपर्क ९८५०८४२७०३