मुक्तपीठ टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. दोन वर्षांपूर्वी या दिवशी ठाकरे सरकारनं सत्तेवर आलं होतं. आघाडी सरकारच्या द्वितीय वर्षपूर्तीबद्दल बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी कारभाराबद्दल माहिती दिली आहे. हे सरकार बोलणारं नाही तर करणारं सरकार असल्याचे ते म्हणालेत.
काम करायचं नाही, केवळ प्रसिद्धी करायची. ते धोरण आमचं नाही!
- नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारबद्दलचे आपले मत मांडताना भाजपवर निशाणा साधला.
- दोन वर्षांपूर्वी आघाडीचं सरकार स्थापन झालं.
- आजच्या दिवशी मुख्यमंत्र्यांसह पाच मंत्र्यांनी शिवतीर्थावर शपथ घेतली.
- त्या दिवसापासून जनतेला न्याय देणं आणि महाराष्ट्राला पुढे नेण्याचा दृष्टीकोण आम्ही ठेवला आहे.
- नैसर्गिक आपत्ती आणि मानव निर्मित आपत्ती निर्माण झाल्यावरही आमच्या सरकारने यशस्वीपणे परिस्थिती हाताळली आहे.
- आम्ही दोन वर्षात काहीच काम केलं नाही असं काही लोक म्हणत आहेत. पण या दोन वर्षात आम्ही काटकसरीचं धोरण स्वीकारलं.
- कोणत्याही कामाचा जास्त गाजावाजा करायचा नाही असे ठरवले.
- जेव्हा काटकसरीचं धोरण स्वीकारतो तेव्हा कामगिरी कमी आणि गाजावाजा जास्त असं आम्ही करत नाही.
- उत्तर प्रदेशात छोटं काम होतं पण मुंबईतल्या वर्तमानपत्रात जाहिराती येतात.
- आमचं धोरण आहे, बाते कम, काम ज्यादा. इतरांचं धोरण, काम करायचं नाही, केवळ प्रसिद्धी करायची. ते धोरण आमचं नाही.
मागील सरकारची आश्वासने, महाविकास आघाडीने ती पूर्ण केली
- महाविकास आघाडीच्या दोन वर्षांच्या सत्तेत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
- मागील सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. पण तीन वर्ष त्यांना कर्जमाफी करता आली नाही.
- शेतकरी आंदोलन करत राहिले. त्यांना शेतकऱ्यांना न्याय देता आला नाही.
- आमचे सरकार आले. पहिल्याच कॅबिनेटमध्ये कर्जमाफी केली. दोन लाखांचे कर्ज घेणाऱ्यांना दोन महिन्याच्या आत कर्ज माफ केले. वीस हजार कोटींचे कर्ज माफ केले.
- दोन लाखांवर ज्यांनी कर्ज घेतले, त्यांना आश्वासन दिले आहे. भविष्यात त्यांचा विचार करू.
- ज्यांनी नियमित कर्ज भरले त्यांचाही विचार होणार आहे. कोरोनामुळे आर्थिक ताण आला. पण आता त्यावरही निर्णय घेऊ, असे नवाब मलिक म्हणाले.
कोरोनात इतर राज्यात जे घडलं ते महाराष्ट्रात घडलं नाही!
- कोरोना काळात काही राज्यांमध्ये स्मशानभूमीत जागा कमी पडल्याने मृतदेह नदीत टाकले. गंगेशेजारी दफन केले. तसे कुठेही महाराष्ट्रात करण्यात आले नाही.
- देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात होते, तरीही इतर राज्यांसारखी परिस्थिती आपल्या राज्यात झाली नाही.
- लोकांचा मृत्यू झाला. पण मृतदेहांची अवहेलना झाली नाही आणि अंतिम संस्कार क
रण्याचीही व्यवस्था होती.