मुक्तपीठ टीम
जर तुमचा स्मार्टफोन चोरी झाला असेल आणि त्यात असलेल्या डेटाबद्दल काळजी वाटत असेल. तर काळजी वाटणं स्वाभाविकच असतं. पण आता चिंतेची बाब नाही. तसेच जरी स्मार्टफोनमध्ये गुगल पे आणि पेटीएम अकाउंट लॉग इन असेल. तुम्ही ते लॉक करण्यासाठी पासकोड किंवा स्क्रीन लॉक वापरले असले तरीही, तुम्हाला त्यांचा गैरवापर होण्यापासून रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलणे आवश्यक आहे.
स्मार्टफोनवरून पेटीएम अकाउंट कसे डिलीट करता येणार?
- पेटीएम यूजर्स त्यांच्या सर्व डिव्हाइसेसमध्ये लॉग इन अकाउंटसह सहजपणे लॉग आउट करू शकतात, परंतु यासाठी तुम्हाला अकाउंटचा पासवर्ड आणि नोंदणीकृत मोबाइल नंबर लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
- तुम्ही तुमच्या पेटीएम अकाउंटशी लिंक केलेल्या सर्व डिव्हाइसेसवरून याप्रमाणे लॉग आउट करू शकता.
- सर्व प्रथम तुम्हाला कोणत्याही दुय्यम डिव्हाइसवर पेटीएम अॅप इंस्टॉल करावे लागेल आणि नंतर त्यावर लॉग इन करावे लागेल.
- आता तुम्हाला हॅम्बर्गर मेनूवर टॅप करावे लागेल, तुम्हाला ते स्क्रीनच्या वर डावीकडे दिसेल.
- त्यानंतर तुम्हाला प्रोफाईल सेटिंग्ज टॅबवर क्लिक करावे लागेल.
- या विभागात तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. यूजर्सना फक्त सिक्युरिटी आणि प्रायव्हसीवर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर ‘मॅनेज अकाउंट्स ऑन ऑल डिव्हाइसेस’ पर्यायावर टॅप करा.
- तुम्ही त्यावर टॅप केल्यावर, अॅप तुम्हाला खात्रीसाठी तुम्ही सर्व डिव्हाइसेसमधून लॉग आउट करत आहात का असे विचारणारा मेसेज दाखवतो.
- त्यानंतर तुम्ही होय किंवा नाही दाबू शकता.
- याशिवाय तुम्ही “०१२०४४५६४५६” डायल करू शकता जो पेटीएमचा हेल्पलाइन नंबर आहे.
- एकदा तुम्ही कॉल केल्यावर, तुम्हाला क्वेरीशी संबंधित अनेक पर्याय दिले जातील आणि तुम्हाला फक्त लॉस्ट फोनचा पर्याय निवडावा लागेल.
- त्यानंतर, तुम्हाला दुसरा नंबर टाकण्याचा पर्याय निवडावा लागेल आणि नंतर तुमचा हरवलेला फोन नंबर टाकावा लागेल.
- त्यानंतर तुम्ही सर्व उपकरणांमधून लॉग आउट करू शकता.
तुम्ही तुमचे पेटीएम अकाउंट तात्पुरते ही ब्लॉक करू शकता. जर तुम्हाला वाटत असेल की, तुमचे अकाउंट या पद्धतीद्वारे लॉग आउट होणार नाही, तर तुम्ही तुमचे पेटीएम अकाउंट काही काळ ब्लॉक करू शकता. येथे तुम्ही खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुमचे अकाउंट ब्लॉक करू शकता.
पेटीएम अकाउंट तात्पुरते कसे ब्लॉक करावे?
- सर्व डिव्हाइसेसमधून लॉग आउट केल्यानंतर, यूजर्स पेटीएम वेबसाइटवर जाऊ शकतात.
- तेथे तुम्हाला २४×७ मदत निवडावी लागेल.
- त्यानंतर तुम्हाला ‘रिपोर्ट अ फ्रॉड’ निवडावे लागेल. आणि तुम्हाला तुमच्यानुसार श्रेणीवर क्लिक करावे लागेल.
- आता तुम्हाला ‘मेसेज अस’ बटणावर क्लिक करावे लागेल आणि खात्याच्या मालकीचा पुरावा सबमिट करावा लागेल.
- त्यानंतर पेटीएम तुमचे खाते पुन्हा तपासेल आणि ब्लॉक करेल.
चोरी झालेल्या फोनवरून गुगल पे कसे काढायचे किंवा ब्लॉक करायचे?
- तुम्हाला तुमच्या चोरीला गेलेल्या फोनवरून गुगल खाते हटवायचे असल्यास गुगल तुम्हाला त्यासाठी पूर्ण परवानगी देते.
- जर तुमचा फोन हरवला असेल आणि तुम्हाला तुमच्या डेटाबद्दल काळजी वाटत असेल, तर हे तुमच्यासाठी खूप उपयुक्त फीचर आहे.
- तुमच्या फोनवरील डेटा शोधण्यासाठी, लॉक करण्यासाठी किंवा डिलीट करण्यासाठी, तुम्हाला “android.com/find” वर जाऊन तुमच्या गुगल अकाउंटमध्ये साइन इन करावे लागेल.
- हे पूर्ण झाल्यानंतर तुम्ही इरेज डेटा निवडू शकता.
- याशिवाय तुम्ही ग्राहक सेवेचीही मदत घेऊ शकता.
- गुगल यूजर्स १८००४१९०१५७ डायल करू शकतात. त्यानंतर तुम्ही ‘अदर इश्यू’ हा पर्याय निवडू शकता. ७. त्यानंतर तुम्ही तज्ञांशी बोलण्याचा पर्याय निवडू शकता. हे तुम्हाला तुमचे गुगल अकाउंट ब्लॉक करण्यात मदत करू शकते.
- यासाठी यूजर्संना त्यांच्या नोंदणीकृत गुगल अकाउंट मोबाईल क्रमांकाची पडताळणी करण्यास सांगितले जाईल.