Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हिवाळी अधिवेशन नागपूरला न होणे ही निंदनीय बाब – डॉ. आशिष देशमुख

November 27, 2021
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Ashish deshmukh

मुक्तपीठ टीम

  • नागपूर कराराप्रमाणे हिवाळी अधिवेशन नागपूरला व्हायला पाहिजे, असा नियम आहे.
  • मार्च’२२ मधील ‘बजेट अधिवेशन’ किमान २ महिने नागपूरला घ्यावे, अशी मागणी.
  • विदर्भासाठी जास्तीची भरीव तरतूद मुंबई येथील या अधिवेशनात करावी, अशी मागणी.

 

“विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे डिसेंबर’२१ मध्ये मुंबई येथे करणार असल्याचं राज्य सरकारच नियोजन असून त्यावर मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले आहे. खरंतर नागपूर कराराप्रमाणे हे हिवाळी अधिवेशन नागपूरला व्हायला पाहिजे होतं. गेल्या वर्षी कोरोना संकटामुळे हे अधिवेशन मुंबईलाच झाले होते. मागील पावसाळी अधिवेशनाच्या समाप्तीनंतर येणारे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबर २०२१ पासून नागपूरला होईल, अशी घोषणासुद्धा करण्यात आली होती. असे असतांनादेखील हे अधिवेशन मुंबई येथे घेण्यात येणार आहे. मुंबई येथे विधीमंडळाचे अधिवेशन घ्यायचे असल्यास, अधिवेशनाच्या ४५ दिवस आधी नियमानुसार विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक होऊन मुंबईच्या अधिवेशनावर शिक्कामोर्तब केल्या जाते. परंतु तसे काही झालेच नाही. नागपूर कराराचा सन्मान म्हणून, विदर्भाच्या विकासासाठी असलेली प्रतिबद्धता सिद्ध करण्यासाठी आणि या प्रदेशाच्या प्रश्‍नांना न्याय देण्यासाठी नागपूरचे हे हिवाळी अधिवेशन दरवर्षी व्हावे, असा नियम आहे. विदर्भातील उद्योगधंदे, बेरोजगारी, कृषी, शेतकरी आत्महत्या, सिंचन, पर्यटन, गुंतवणूक, सर्वांगीण विकास असे अनेक प्रश्न प्रलंबित असून यावर उपाय-योजना काढण्यासाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाला फार महत्व आहे. नागपूर करारानुसार हे हिवाळी अधिवेशन ज्या हेतूसाठी भरवले जाते, तो हेतू त्यातून पूर्णत्वास जात नसेल तर विदर्भाचा विकास होणारच नाही.”
“विदर्भातील २ कोटी जनतेच्या दृष्टीने नागपूरला हे अधिवेशन न होणे, ही निंदनीय बाब आहे. यावर्षीसुद्धा हिवाळी अधिवेशन नागपूरला होणार नाही. तेव्हा आता मार्च’२२ मधील ‘बजेट अधिवेशन’ किमान २ महिने नागपूरला घ्यावे आणि विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारने त्यात भरीव अशी तरतूद करून द्यावी, अन्यथा हे सरकार विदर्भाप्रती असंवेदनशील आहे, असा जनतेचा समज होईल. हिवाळी अधिवेशन नागपूरला न होणे ही निंदनीय बाब आहे आणि या कृतीचा आम्ही वैदर्भीय जनता निषेध करीत आहे”, अशी प्रतिक्रिया माजी आमदार व कॉंग्रेसचे नेते डॉ. आशिष देशमुख यांनी व्यक्त केली आहे. विदर्भासाठी जास्तीची भरीव तरतूद मुंबई येथील या अधिवेशनात करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
नागपूर कराराप्रमाणे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन डिसेंबर’२१ मध्ये नागपूरला घेण्याबाबत एक विनंतीपत्र डॉ. आशिष देशमुख यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना दि. १३.११.२०२१ ला पाठविले होते, हे विशेष.


Tags: Ashish DeshmukhnagpurUddhav ThackerayWinter Sessionआशिष देशमुखउद्धवजी ठाकरेनागपूरहिवाळी अधिवेशन
Previous Post

दाटीवाटीच्या वस्त्यांमधील इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

Next Post

मुंबई, कोल्हापूर, नंदुरबारमध्ये आघाडी-भाजपाचं ठरलं! वाशिम, नागपुरातच का बिघडलं?

Next Post
mlc elections in maharashtra

मुंबई, कोल्हापूर, नंदुरबारमध्ये आघाडी-भाजपाचं ठरलं! वाशिम, नागपुरातच का बिघडलं?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!