मुक्तपीठ टीम
मुंबईतील शक्ती मिलच्या ओसाड पडीक वास्तूत एका तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील तीन नराधमांची फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने बदलली आहे. २०१३मधील या अमानूष गुन्ह्यातील आरोपींना २०१४मध्ये मुंबई सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली होती. आता मुंबई उच्च न्यायालयाने त्या तिन्ही नराधमांच्या फाशीची शिक्षा रद्द करत त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
- ही घटना २२ ऑगस्ट २०१३ मध्ये घडली होती.
- एक महिला फोटो पत्रकार शक्ती मिल कंपाऊंडमध्ये तिच्या एका सहकाऱ्यासोबत फोटाग्राफी करण्यासाठी गेली होती.
- वास्तविक, महालक्ष्मी परिसरात वर्षानुवर्षे ही मिल बंद होते.
- त्या दिवशी संध्याकाळचे ६ वाजले होते.
- महिला पत्रकार आणि तिचा साथीदार तेथे पोहोचल्यावर तेथे उपस्थित काही लोकांनी पोलीस असल्याचे सांगत त्यांना फोटो काढण्यापासून रोखले.
- ते लोक म्हणाले की आधी तुम्ही आमच्या अधिकाऱ्याची परवानगी घ्या आणि मग फोटो काढा.
- त्यानंतर त्यांनी महिला पत्रकार आणि तिच्या साथीदाराला आत घेतले.
- त्यांना आत घेऊन दोघांवरही हल्ला करून तेथील महिला पत्रकाराच्या साथीदाराला बांधून ठेवले.
- त्यानंतर महिला पत्रकारावर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केला.
७२ तासांत पोलिसांनी पाचही आरोपींना पकडले
- दोन तासांनंतर दोघेही कसेबसे जीव वाचवून रुग्णालयात पोहोचले.
- रुग्णालयातील डॉक्टरांना मुलीची स्थिती पाहताच त्यांना संपूर्ण प्रकरण समजले.
- डॉक्टरांनी पोलिसांना माहिती दिली.
- महिला पत्रकारावर झालेल्या सामूहिक बलात्काराची बातमी ऐकून पोलीसही चक्रावून गेले.
- त्यानंतर लगेचच अनेक पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला.
- ७२ तासांत पोलिसांनी पाचही आरोपींना पकडले.
चौकशीदरम्यान आणखी एक सामूहिक बलात्काराचे प्रकरण समोर
- प्रत्यक्षात या आरोपींना अटक केल्यानंतर काही दिवसांनी कॉल सेंटरमध्ये काम करणारी टेलिफोन ऑपरेटरने तिच्यावर यातील ३ तरुणांवर सामूहिक बलात्काराचा आरोपही केला.
- ३१ जुलै २०१३ रोजी शक्ती मिल परिसरातच यातील तीन तरुणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचे तरुणीने पोलिसांना सांगितले.
त्यादरम्यान त्यांना मारहाणही करण्यात आली. - या दोन्ही सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी ऑक्टोबरमध्ये अटक केलेल्या पाच आरोपींविरुद्ध ३६२ पानांचे आरोपपत्र दाखल केले होते.
- या दोन्ही सामूहिक बलात्कार प्रकरणात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी पीडितांच्या वतीने युक्तिवाद केला, त्यानंतर न्यायालयाने सर्व आरोपींना दोषी ठरवले.
पॉर्न चित्रपट पाहून पीडितेचा शोध घेत असत
- अटक आरोपींनी पोलिसांना दिलेल्या जबानीवरून हे सर्वजण सेक्सचे वेडे होते आणि शिकार शोधत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
- मदनपुरा, भायखळा आणि आग्रीपाडा येथे नियमितपणे पॉर्न फिल्म पाहत असल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले होते.
- याशिवाय ते रेड लाईट एरियात फिरत असे.
- आरोपी विजय जाधव, कासिम बंगाली आणि अल्पवयीन यांनी चौकशीदरम्यान सांगितले की, ते अनेकदा पॉर्न पाहण्यासाठी जात असत.
नराधमाला नव्हता पश्चाताप
- पत्रकारावर सामुहिक बलात्कार करणाऱ्यांमधील अल्पवयीन मुलाने केलेल्या कृत्याचा पश्चाताप न करता रात्री पाव भाजी खाल्ली होती.
- तीन तासांपूर्वी त्याने एका तरुणीचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचे त्याच्या वागण्यातून अजिबात वाटत नव्हते.
- त्यामुळे या पाचपैकी तीन आरोपींनी पुन्हा बलात्कारासारखा गुन्हा केला असल्याने सत्र न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा दिली होती.
- उच्च न्यायालयाने या तीन आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करत ती जन्मठेपेवर आणली आहे.