मुक्तपीठ टीम
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो भविष्यातील तंत्रज्ञानावर काम करत आहे. इस्रोची टीम सध्या काम संपल्यावर स्वत:ला नष्ट करू शकणारे रॉकेट आणि उपग्रह बनवण्याच्या प्रयत्नात आहे. त्याचवेळी कोणालाही हॅक करता येणार नाही अशी कम्युनिकेशन सिस्टम विकसित करण्याच्या प्रकल्पावरही काम सुरु आहे. ही यंत्रणा लवकरच प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे.
इस्त्रोला या दोन शोध प्रकल्पांमध्ये यश मिळालं तर मोठा फायदा होईल. इस्रोला अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्याबाबतीतही अमेरिकन स्पेस एजन्सी नासाला आणि रशियन स्पेस एजन्सी रॉसकॉसमॉसशी स्पर्धा करता येईल. सध्यातरी या स्पर्धेत इस्त्रोपेक्षा चीनची स्पेस एजन्सी म्हणजेच चायना नॅशनल स्पेस एजन्सी ही सर्वात पुढे आहे.
इस्त्रोच्या भविष्यवेधी योजना
- इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी डीटीडीआय-टेक्नॉलॉजी कॉन्क्लेव्ह-२०२१ समिटमध्ये या योजनांची माहिती दिली.
- इस्रो अंतराळ क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान शोधण्यात आणि त्याचा वापर करण्यात गुंतलेली आहे.
- त्यांनी अनेक नवीन तंत्रज्ञानाचा उल्लेख केला.
- उदाहरणार्थ, क्वांटम आधारित उपग्रह. इस्रो आता हा उपग्रह बनवणार आहे, तर अमेरिकेने नुकतेच अशा एका उपग्रहाचा वापर केला आहे.
क्वांटम रडार, सेल्फ-ब्रिकिंग रॉकेट्स, सेल्फ-एलिमिनेटेड सॅटेलाइट्स, सेल्फ-रिकव्हरी ऑब्जेक्ट्स, ह्युमनॉइड रोबोट्स, स्पेस बेस्ड सोलर पॉवर, इंटेलिजेंट सॅटेलाइट्स, स्पेस व्हेइकल्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड स्पेस अॅप्लिकेशन्स इत्यादी संकल्पनांवर काम केले जात आहे.
स्वत: नष्ट होणाऱ्या उपग्रहास वेळ…
- अंतराळातील कचरा कमी करण्यासाठी इस्रो काम करत आहे.
- ते अशा तंत्रज्ञानावर काम करत आहे ज्यामध्ये काम संपल्यानंतर निरुपयोगी उपग्रह स्वतः वाफेच्या रूपात नष्ट होऊ शकतीत.
- भारताकडे अजूनही पुन्हा वापरता येण्याजोगे रॉकेट्स विकसित नाही.
लेझरवरून संदेश पाठवण्याची चाचणी यशस्वी!
- क्वांटम कम्युनिकेशन सिस्टीममध्ये चांगली प्रगती आहे.
- इस्रोने ३०० मीटर अंतरापर्यंत लेझर लाइटद्वारे संदेश पाठविण्याची यशस्वी चाचणी केली आहे.
- यानंतर हे तंत्रज्ञान उपग्रहांमध्ये बसवले जाईल.
- पृथ्वीच्या कक्षेतून लेझर जमिनीवर पाठवेल, असे शक्तिशाली लेझर लाइट उपकरण तयार केले जाईल.
इस्रोचे प्रमुख सिवन यांचा दावा आहे की, ज्या तंत्रज्ञानाबद्दल बोलले जात आहे त्यावर अंतराळ विभाग आणि इस्रोच्या विविध केंद्रांवर काम केले जात आहे. जर सर्व केंद्रे सामंजस्याने काम करत राहतील तर, लवकरच आपण हे तंत्रज्ञान प्रयोगशाळांमधून बाहेर काढू शकू आणि सामान्य वापरात आणू शकतो. या कामात सरकारी-खासगी आणि आंतरराष्ट्रीय करार असेल तर ही कामे अधिक सहज आणि वेगाने करता येतील.