मुक्तपीठ टीम
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण आणि इतर मागण्यासाठी राज्यभरात एसटी कर्मचारी संपावर आहेत. आपल्या मागण्यांसाठी ते आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला १५ दिवसांपेक्षा अधिक काळ उलटूनही अद्याप तोडगा निघालेला नाही. दरम्यान औरंगाबदमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन तीव्र केले आहे. कोल्हापूरात एसटी कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ प्रवासी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. एकीकडे तडजोडीची बोलणी, तर दुसरीकडे एसटी संपाची तीव्रता कायम असल्याचे दिसत असल्याने वाट्टेल त्या थातुर मातुर आश्वासनांवर एसटी कर्मचाऱ्यांची बोळवण करणे शक्य होईल असे नाही.
औरंगाबाद बसस्थानकावर कर्मचाऱ्यांचे आंदोलन आणखी तीव्र
- एसटीचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत.
- औरंगाबाद बसस्थानकावर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन आणखी तीव्र केले आहे.
- बस स्टँड आवारात एसटी कर्मचारी जोरदार घोषणाबाजी करत आहेत.
- विलिनिकरणाशिवाय दुसरा कुठलाही प्रस्ताव मान्य नसल्याची कर्मचाऱ्यांची भूमिका आहे.
- निलंबित एसटी कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांना पेढे वाटून गांधीगिरी केली आहे.
- औरंगाबाद बस स्थानकाच्या डेपो मॅनेजरला पेढे वाटून गांधीगिरी केली.
एसटी कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ प्रवासी विद्यार्थी रस्त्यावर
- दुसरीकडे कोल्हापूरात एसटी कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ प्रवासी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.
- कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकात विद्यार्थ्यांनी प्रवाशांकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना समर्थन देत जोरदार घोषणाबाजी केली.
- लाल परी रस्त्यावर झाली पाहिजे अशी केली मागणी
परिवहन मंत्री अनिल परब यांची मध्यम मार्गाची भूमिका
- परिवहन मंत्री अनिल परब यांच्या ताठर भूमिकेमुळे संप चिघळत असल्याचा आरोप होत होता.
- मात्र, राष्ट्र्वादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी मध्यम मार्गाचे सुतोवाच केले.
- मंगळावारी एसटी कर्मचारी प्रतिनिधी आणि भाजपा नेते सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकरांशी चर्चेनंतर माध्यमांसमोर सकारात्मक भूमिका मांडली.
- कर्मचाऱ्यांना अंतरिम वेतनवाढीचा पर्याय कामगारांना जे जे हवं आहे ते आम्ही देत आहोत.
- एका बाजूने समितीची प्रक्रिया सुरू आहे.
- याला बराच कालावधी लागणार आहे.
- तिढा कायम राहू नये, यासाठी कर्मचाऱ्यांना अंतरिम वेतनवाढीचा पर्याय दिला आहे.
- दरम्यान याच संदर्भात बुधवारी पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यामध्ये आज बैठक होणार आहे.