मुक्तपीठ टीम
सीडॅकमध्ये म्हणजेच प्रगत संगणन विकास केंद्रात प्रोजेक्ट मॅनेजर, प्रोजेक्ट इंजिनीअर, सिनियर प्रोजेक्ट इंजिनीअर, असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर या पदांसाठी एकूण १११ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ९ डिसेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- १) प्रथम श्रेणी बी.ई/ बी.टेक (कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/ आयटी/ इलेक्ट्रॉनिक्स) किंवा प्रथम श्रेणी एमसीए २) ९ वर्षे अनुभव
- पद क्र.२- १) प्रथम श्रेणी बी.ई/ बी.टेक (कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/ आयटी/ इलेक्ट्रॉनिक्स) किंवा प्रथम श्रेणी एमसीए २) १ ते ५ वर्षे अनुभव
- पद क्र.३- १) प्रथम श्रेणी बी.ई/ बी.टेक (कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/ आयटी/ इलेक्ट्रॉनिक्स) किंवा प्रथम श्रेणी एमसीए २) ३ ते ५ वर्षे अनुभव
- पद क्र.४- १) प्रथम श्रेणी बी.ई/ बी.टेक (कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/ आयटी/ इलेक्ट्रॉनिक्स) किंवा प्रथम श्रेणी एमसीए २) ३ ते ५ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास वयाचे वय पद क्र.१ साठी ५० वर्षांपर्यंत तर, पद क्र.२ ते ४ साठी ३५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी सीडॅकच्या अधिकृत वेबसाइट https://www.cdac.in/ वरून माहिती मिळवू शकता.