Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एसटी संप : शिवसेना म्हणते भाजपाकडून कोंडी, तर भाजपाचा शिवसेनेवर खासगीकरण अफवाबाजीचा आरोप!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
anil sada

मुक्तपीठ टीम

एसटीच्या सरकारमधील विलिनीकरणासह इतर मागण्यांसाठी कर्मचारी आंदोलन करत आहेत. एसटी संपाचा तिढा सुटत नसतानाच आता आरोप-प्रत्यारोपांचा धूर निघू लागला आहे. भाजपा नेत्यांनी सरकारवर खासगीकरणाच्या अफवा पसरवून कर्मचाऱ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला आहे. तर शिवसेना नेते, परिवहन मंत्री अनिल परब यांनी संपकरी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करून भाजपा त्यांची कोंडी करत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आता चर्चा जरी करायची झाली तर कोणाबरोबर असा प्रश्न पडला असल्याचे ते म्हणाले.

 

दहशत पसरवण्यासाठी खासगीकरणाची अफवा!

रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. एसटीच्या खासगीकरणाची कितीही अफवा उठवली तरी आंदोलन सुरूच राहील. एकही कामगार घरी जाणार नाही, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.

 

“एसटीचे खासगीकरण करणार अशी अफवा सरकार पसरवत आहे. जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या पूर्ण करत नाही, तोपर्यंत असे काहीही होणार नाही त्यामुळे आमचा संप संपेल आणि सर्व एसटी कर्मचारी आपापल्या घरी जातील असं सरकारला वाटत आहे. पण हा सरकारचा भ्रम आहे. आम्ही आझाद मैदानावर आंदोलन सुरूच ठेवणार आहोत”, असे खोत यांनी म्हटलं आहे.

 

भाजपाकडून एसटी कर्मचाऱ्यांची कोंडी

भाजपाने एसटी कर्मचाऱ्यांची कोंडी केली आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण होणे सध्या शक्य नाही हे भाजपाही पक्के माहीत आहे. कामगारांनीही हे सत्य स्वीकारले आहे, पण भाजप नेत्यांमुळे संपकऱ्यांची कोंडी झाली. दहशत , ब्लॅकमेल व वैफल्याचे हे राजकारण आहे, अशी घणाघाती टीका शिवसेनेने केली आहे.

 

शिवसेनेने केलेला आक्रमक हल्ला

  • सध्याच्या कठीण काळात नोकरी टिकवून ठेवणे हे महत्त्वाचे आहे.
  • भारतीय जनता पक्ष या विषयावर कामगारांची डोकी भडकवून काय साध्य करणार आहे?
  • कामगारांचा संप मोडावा किंवा फुटावा असे सरकारचे धोरण दिसत नाही, पण चर्चेतून मार्ग निघावा हेच सगळ्यांचे म्हणणे आहे. पण चर्चा करणार कोणाशी?
  • मोदी सरकारने अनेक सार्वजनिक उपक्रम कवडीमोल भावात विकायला काढले आहेत. मग एसटी विलिनीकरणाचा हट्ट का?
  • महाराष्ट्रातील भाजपा पुढारी एस.टी. कामगारांची डोकी भडकवीत आहेत. हे माणुसकीला धरून नाही.
  • अशा आडमुठ्या धोरणांमुळे मुंबईतील अडीच लाख गिरणी कामगार देशोधडीस लागला हे वास्तव आहे.
  • एसटी महामंडळाचे विलीनीकरण शक्य नाही, असे सरकार सांगत आहे तेव्हा त्यास कायदेशीर आधार आहे.

Tags: Anil ParabBJPGovernment of MaharashtraMaharashtramuktpeethSadabhau Khotshiv senaST staffST Strikeएसटी कर्मचारीएसटी संपभाजपामहाराष्ट्र सरकारमुक्तपीठशिवसेना
Previous Post

देशात सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनाला यश, पण काय होते तीन कृषी कायदे?

Next Post

वा रे राजकारणी! यांचे जय किसान तर त्यांचे जय कामगार! सारं दाखवण्यासाठीच, दोघांच्या भल्यासाठी कोणी नाही!

Next Post
anil pravin

वा रे राजकारणी! यांचे जय किसान तर त्यांचे जय कामगार! सारं दाखवण्यासाठीच, दोघांच्या भल्यासाठी कोणी नाही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!