मुक्तपीठ टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे झोनल संचालक समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या बनावट दाखल्यांच्या आरोपांना त्यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी उत्तर दिले आहे. ट्वीटद्वारे कागदपत्रांसह त्यांनी उत्तर दिले आहे. खल विचारांच्या काहींकडून समीर वानखेडे यांना बदनाम करण्यासाठी अर्धवट माहिती दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
नवाब मलिक यांनी मुंबईतील सेंट जोसेफ आणि सेंट पॉल या दोन शाळांमधील समीर वानखेडेंचे शाळा सोडल्याचे दाखले माध्यमांसमोर मांडले आहेत. ते मांडताना समीर वानखेडेंचा धर्म मुळात मुसलमानच असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. तसाच आणखी एक दाखला सादर करत त्यात हिंदू महार करण्यात आल्याचे दाखवत त्यांनी सर्व फर्जीवाडा केला जात असल्याचा आरोपही केला. लवकरच वानखेडेंची नोकरी जाईल, असेही ते म्हणाले.
दाखल्यांमधील चुकांची दुरुस्ती केली!
मलिकांना उत्तर देण्यासाठी क्रांती रेडकर यांनी ट्विटरचे माध्यम वापरले. त्यांनी म्हटले की काही भुतांकडून समीर वानखेडे यांना बदनामा करण्यासाठी अर्धवट माहिती प्रसारीत केली जात आहे. त्या दाखल्यांमध्ये काही चुका होत्या. त्यामुळे समीर वानखेडेंचे वडिल ज्ञानदेव वानखेडे यांनी १९८९साली त्या चुका दुरुस्त केल्या. त्या दुरुस्त केलेल्या चुकांची पडताळणी शाळांनी केली.
Half info shared by people with evil thoughts to defame Sameer Wankhede. There was an error made. Later this was duly rectified by mr. DNYANDEV with all legal formalities n procedures in 1989. All the documents were accepted and verified by the school principal then and now too. pic.twitter.com/H6bhELW5WJ
— Kranti Redkar Wankhede (@KrantiRedkar) November 18, 2021
मलिकांचे तीन आरोप
- एक आयपीएस अधिकारी त्यांचा शेजारी होता. त्यांच्याशी त्यांचं बिनसलं. त्यांनी या अधिकाऱ्याच्या मुलाला एका गुन्ह्यात फसवलं.
- पत्नीच्या चुलत भावालाही अडकवलं. वानखेडे यांनी ज्या मुलीला घटस्फोट दिला ती मुलगी कधीही विरोधात जाईल म्हणून तिच्या एका चुलत भावाला ड्रग्स प्रकरणात अडकवलं.
- शाळा सोडल्याचे बनावट दाखले सादर केले
आज लागणार निकाल
- मुंबई महापालिकेची सर्व कागदपत्रं पाहिली असल्याचे मलिक यांनी सांगितले.
- शाळेच्या दाखल्यापासून न्यायालयासमोर ठेवल्या आहेत.
- सर्व कागदपत्रे आम्ही त्यांच्या वकिलांना दिली आहेत.
- दुपारी न्यायाधीशाच्या चेंबरमध्ये त्यावर सुनावणी होणार आहे.
- समीर वानखेडेंच्या वडिलांनी मलिकांविरोधात सव्वा कोटीचा मानहानीचा दावा केला आहे.
- त्यांना ट्विट करण्यापासून रोखण्याची त्यांनी मागणी केली आहे.
- त्यावर उच्च न्यायालयात त्यावर सुनावणी होणार आहे.