मुक्तपीठ टीम
इंडियन ऑईलमध्ये ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-४ प्रोडक्शन या पदांवर भरती आहे. ही भरती १६ जागांसाठी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार १९ फेब्रुवारी २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार ५०% गुणांसह केमिकल/रिफाइनरी आणि पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा बी.एससीमध्ये गणित, फिजिक्स, केमिस्ट्री, इंडस्ट्रियल केमिस्ट्री या विषयात पदवीप्राप्त असावे. एससी/एसटी या प्रवर्गाला ४५% गुणांची सूट देण्यात आली आहे. तसेच १ वर्ष अनुभव असावा.
वयोमर्यादा
या पदासाठी उमेदवारांचे कमाल वय १९ फेब्रुवारी २०२१ रोजी १८ ते २६ वर्षांपर्यंत असावे. एससी/एसटी: ५ वर्षे सूट, ओबीसी: ३ वर्ष वयोमर्यादेमध्ये सूट दिली आहे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल, ओबीसी प्रवर्गासाठी १५० रुपये आणि एससी, एसटी प्रवर्गासाठी कोणतेही शुल्क आकारलेले नाहीत.
अधिक माहितीसाठी इंडियन ऑईलच्या अधिकृत वेबसाइट www.iocl.com वरून माहिती मिळवू शकता.