मुक्तपीठ टीम
रिअल इस्टेट क्षेत्रातील प्रमुख कंपनी गोदरेज प्रॉपर्टीजची विक्री आणि बुकिंग वाढत आहे. यावर्षी म्हणजे २०२१च्या एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत विक्री-बुकिंग १८ टक्क्यांनी वाढून ३,०७२ कोटी रुपये झाली आहे. निवासी मालमत्तेच्या मागणीमुळे कंपनीच्या विक्री बुकिंगमध्ये वाढ झाली आहे. कंपनीने सांगितले की मागील वर्षी याच कालावधीत त्यांची विक्री बुकिंग २,६०५ कोटी रुपये होती.
गुंतवणूकदारांच्या मते, चालू आर्थिक वर्षातील जुलै-सप्टेंबर या कालावधीत व्हॉल्यूमच्या आधारावर कंपनीची विक्री बुकिंग ३ टक्क्यांनी वाढून ४३,८३,९५९ चौरस फूट झाली, जी मागील आर्थिक वर्षातील याच कालावधीत ४२,४१,२८३ चौरस फूट होती. कंपनीच्या म्हणण्यानुसार, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत एकूण विक्री बुकिंगपैकी, निवासी मालमत्तांचा वाटा ३,०५१ कोटी रुपये होता, तर व्यावसायिक मालमत्तांचा वाटा २० कोटी रुपये होता.
दिल्ली-एनसीआर मार्केटने सर्वाधिक १,०६३ कोटी रुपयांच्या विक्रीचे योगदान दिले. त्यापाठोपाठ पुण्याने ६०७ कोटी रुपये, मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) ५२५ कोटी आणि बेंगळुरूने ३३० कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. गोदरेज प्रॉपर्टीजने अलीकडेच नोंदवले होते की ३० सप्टेंबर रोजी संपलेल्या चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफा पाच पटीने वाढून ३५.७२ कोटी रुपये झाला आहे. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत ते ७.१० कोटी रुपये होते.
पाहा व्हिडीओ: