Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्रातील हिंसाचारानंतर आता ‘फोटोकारण’ भडकलं! “दाखवू का फोटो….”

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
ashish shelar

मुक्तपीठ टीम

त्रिपुरात न घडलेल्या घटनेवरून महाराष्ट्रात प्रत्यक्षात हिंसाचार भडकला. शुक्रवारी मुसलमान वस्त्यांमध्ये घडलेल्या हिंसाचारानंतर शनिवारी अमरावतीत भाजपाशी संबंधित जमावाने तोडफोड केली. या हिंसाचारानंतर आता महाराष्ट्रात फोटोंचं राजकारण भडकलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  नवाब मलिकांच्या फोटो आरोपाला उत्तर देताना भाजपाचे नेते आशिष शेलारांनी दिलेले उत्तर भविष्यात फोटोकारण वेगळ्या वळणावर जाण्याचा धोका दाखवणारे आहे.

 

“आशिष शेलार रझा अकादमीच्या कार्यालयात काय करत होते?” – नवाब मलिक

गेल्या शुक्रवारी काही मुसलमान वस्त्यांमध्ये झालेल्या हिंसाचारामागे रझा अॅकेडमी असल्याचा आरोप झाला आहे. मात्र, कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी दावा केला की रझा अकादमीकडे संपूर्ण राज्य बंद ठेवण्यासाठी पुरेसे संख्याबळ नाही. मात्र, त्यांचे काही मौलाना राजकीय पक्षांच्या कार्यालयात नक्कीच फिरत असतात. त्याचवेळी त्यांनी भाजपा नेते आशिष शेलारांचा काही मौलानांसोबतचा फोटो दाखवत आशिष शेलार रझा अकादमीच्या कार्यालयात काय करत होते, असा सवाल विचारला. अप्रत्यक्षपणे महाराष्ट्रातील हिंसाचारासाठी त्यांनी भाजपावर आरोप केला.

 

नवाब मलिक पुढे म्हणाले की, महाराष्ट्र दंगलीनंतर आता रझा अकादमीची भूमिकाही महाराष्ट्र पोलिस तपासत आहेत. दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल.

 

महाराष्ट्राचे गृह विभाग संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे. त्याचबरोबर दंगल घडवून आणणाऱ्यांची धरपकड सुरू झाली आहे. एखादा नेताही दोषी असेल तर त्यालाही सोडले जाणार नाही.

 

“आम्ही फोटो दाखवले तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही” – आशिष शेलार

या आरोपानंतर भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार पुढे सरसावले . त्यांनी मलिकांच्या फोटो आरोपाला प्रत्युत्तर दिले.

काय म्हणाले आशिष शेलार?

  • नवाब मलिक यांना  मी मराठीतील ती म्हण पुर्ण सांगणार नाही पण तुमची खोड काही जात नाही, एवढे मात्र खरे.
  • अशा पद्धतीने दरवेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या  फोटोंच्या जीवावर अफवांचे राजकारण करणं हा तुमचा धंदा आहे.
  • पण  त्रिपुराच्या घटनेनंतर महाराष्ट्रात घडलेली दंगलींचा आणि सन २०१६-२०१७च्या फोटोचं संबंध काय?
  • माझ्या या फोटोचा रझा अकादमीच्या फोटोशी संबंध काय?
  • ही बैठक रझा अकादमीच्या कार्यालयात झालेली नाही.
  • जुन्या कुठल्यातरी फोटोचा दाखला देऊन आजच्या दंगलीमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारच्या अपयशाला लपवण्याचे काम तुम्ही करू नका.
  • तुमची खोड जात नसेल तर असे असंख्य फोटो रझा अकादमी सोबतचे आम्हाला दाखवावे लागतील, तेव्हा तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही.
  • महाराष्ट्र विकास आघाडीने आणि राष्ट्रवादीने हे फोटोचं राजकारण बंद करावे.

Tags: ashish shelarNawab MalikTripuraआशिष शेलारत्रिपुरानवाब मलिकरझा अॅकेडमी
Previous Post

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रात १०० जागांसाठी भरती

Next Post

साहित्य संमेलन हे साहित्यिकांसह आपल्या सर्वांचे असल्याने उत्सव म्हणून साजरे करू- छगन भुजबळ

Next Post
sahitya samelan

साहित्य संमेलन हे साहित्यिकांसह आपल्या सर्वांचे असल्याने उत्सव म्हणून साजरे करू- छगन भुजबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!