मुक्तपीठ टीम
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे सोमवारी सकाळी वृद्धापकाळानं निधन झाले. अवघ्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास घराघरात पोहचवणाऱ्या बाबासाहेबांच्या जाण्यानं समाजातील सर्वच स्तरांमधून भावनेचा महापूर लोटला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यापासून राजकीय, सामाजिक, कला क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
नरेंद्र मोदी, पंतप्रधान
हे शब्दांच्या पलीकडचं दु:ख आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने इतिहास आणि सांस्कृतिक विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कार्यामुळेच येणाऱ्या पिढ्या छत्रपती शिवाजी महाराजांशी आणखी जोडल्या जातील. त्यांनी केलेली इतर कामेही स्मरणात राहतील. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे त्यांच्या विपुल कार्यामुळे नेहमी जिवंत राहतील. या दु:खाच्या प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांसोबत आणि असंख्य चाहत्यांसोबत आहेत. ओम शांती.
मला शब्दातीत दुःख झाले आहे.बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने इतिहास आणि संस्कृतीच्या विश्वात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. येणाऱ्या पिढ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याशी जोडल्याबद्दल त्यांचे आपण सदैव ऋणी राहू.त्यांनी केलेले इतर कार्य ही स्मरणात राहील pic.twitter.com/B6GeqH1Shk
— Narendra Modi (@narendramodi) November 15, 2021
अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री
शिवशाहीर बाबासाहेबांच्या निधनानं व्यथित झालोय. छत्रपती शिवाजी महाराजांचे तेजोमय जीवन जनसामान्यांपर्यंत नेण्याचे काम त्यांनी केले. जाणता राजा या नाटकाच्या माध्यमातून त्यांनी धर्मरक्षक छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथा तरुण पिढीच्या हृदयात रुजवल्या.
बाबासाहेब पुरंदरे जी के स्वर्गवास की सूचना से अत्यंत व्यथित हूँ। उन्होंने छत्रपति शिवाजी महाराज जी के गौरवशाली जीवन को जन-जन तक पहुँचाने का भागीरथ कार्य किया। जाणता राजा नाटक के माध्यम से उन्होंने धर्म रक्षक छत्रपति शिवाजी महाराज की शौर्य गाथाओं को युवा पीढ़ी के हृदय में बसाया। pic.twitter.com/tSmE0R82Vq
— Amit Shah (@AmitShah) November 15, 2021
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
पृथ्वीच्या पाठीवर शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही. अशा या अलौकिक शिवसाधकाने शिवरायांच्या स्तुतीसाठीच प्रयाण केले असावे.
काही महिन्यांपूर्वीच शिवशाहीर बाबासाहेंबाच्या शंभरीत पदार्पणानिमित्त अभिष्टचिंतनाचा योग आला होता. त्यावेळीही बाबासाहेबांनी आपल्या दिलखुलास स्वभावाप्रमाणे प्रकृती अस्वास्थ्यावर मात करत सगळ्यांसोबत उत्साहात वाढदिवस साजरा केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांची चिरंतन आराधना हाच शिवशाहीर बाबासाहेबांच्या शतायुष्याचा ऊर्जास्त्रोत राहीला आहे. त्यासाठी त्यांनी शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत असा मुलूख पालथा घालण्यासाठी जीवाचे रान केले. जिथे-जिथे महाराजांचा स्पर्श झालेल्या वस्तू, वास्तू आणि गडकोट-किल्ले तिथे-तिथे बाबासाहेब पोहचले. त्यांनी संदर्भ, माहिती गोळा केली, अभ्यास-संशोधन केले आणि तितक्याच तन्मयतेने शिवमहिमा केवळ महाराष्ट्र, देश नव्हे तर जगभर पोहचविला.
घरा-घरात शिवभक्त निर्माण व्हावेत आणि या शिवभक्तांना त्यांच्या आराध्याच्या तेजःपुंज पैलूंचे दर्शन घडवावे, यालाच बाबासाहेबांनी जीवन कार्य मानले. दिगंतरात विलीन झाल्यावरही ते तिथेही शिवराय चरणी लीन होतील. शिवमहिमा, शिवरायांच्या दिगंत किर्तीची कवने लिहिण्यात आणि ती तडफदार आवाजात, आवेशात पोहचवण्यासाठी दंग होतील.
पुरंदरेवाडा हा अनेकांसाठी अनेक अर्थांनी आधार होता. हा आधारवड त्यांच्या निधनामुळे अंतर्धान पावला आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, साहित्यिक आणि कला परंपरा क्षेत्राला एका व्रतस्थ आणि ऋषीतुल्य अशा मार्गदर्शकाची उणीव भासत राहील. शिवचरित्राच्या अखंड पारायणालाच आयुष्य मानणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो अशी जगदंबा चरणी प्रार्थना. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही. या अलौकिक शिवसाधकाने शिवरायांच्या स्तुतीसाठीच प्रयाण केले असावे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशाहीर पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 15, 2021
अजित पवार, उपमुख्यमंत्री
“ज्येष्ठ साहित्यिक, इतिहास अभ्यासक, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाची मोठी हानी आहे. महाराष्ट्रातील गड-किल्ले, महाराष्ट्राचा इतिहास यांच्याबद्दल आस्था असलेलं त्यांचं व्यक्तिमत्वं होतं. लेखन, व्याख्यान, ‘जाणता राजा’ सारख्या महानाट्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या प्रदीर्घ वाटचालीतील एक महत्वाचा साक्षीदार हरपला आहे. एक अध्याय काळाच्या पडद्याआड गेला आहे. दिवंगत बाबासाहेबांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो.
शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने महाराष्ट्राने साहित्य, कला क्षेत्रातील अध्वर्यू गमावला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने महाराष्ट्राने साहित्य, कला क्षेत्रातील अध्वर्यू गमावला.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 15, 2021
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधान सभा
प्रख्यात शिवशाहीर, महाराष्ट्रभूषण, पद्मविभूषण, सिद्धहस्त लेखक श्री बाबासाहेब पुरंदरे हे आज आपल्यातून निघून गेले. मनाला अतिशय वेदना होत आहेत आणि त्यांच्या आठवणी, त्यांच्या सहवासात घालविलेले क्षण डोळ्यापुढे येत आहेत.
प्रख्यात शिवशाहीर, महाराष्ट्रभूषण, पद्मविभूषण, सिद्धहस्त लेखक श्री बाबासाहेब पुरंदरे हे आज आपल्यातून निघून गेले. मनाला अतिशय वेदना होत आहेत आणि त्यांच्या आठवणी, त्यांच्या सहवासात घालविलेले क्षण डोळ्यापुढे येत आहेत. #BabasahebPurandare pic.twitter.com/S2ilXqHBx4
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 15, 2021
एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री
ज्येष्ठ इतिहास अभ्यासक, व्याख्याते, चरित्रकार, साहित्यिक, शिवचरित्राचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ विचारवंत शिवशाहीर बळवंत मोरेश्वर, तथा बाबासाहेब पुरंदरे यांचे सोमवारी दुःखद निधन झाले. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी त्यांच्या पुण्यातील पर्वती येथील निवासस्थानी भेट देऊन बाबासाहेब पुरंदरे यांच्या पवित्र स्मृतींना उजळा देत विनम्रतापूर्वक अभिवादन केले आणि पुरंदरे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री
“अवघ्या महाराष्ट्राचे दैवत, जेष्ठ इतिहास संशोधक पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे जाणे अत्यंत वेदनादायी आणि अतिशय दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.”
अवघ्या महाराष्ट्राचे दैवत, जेष्ठ इतिहास संशोधक पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे जाणे अत्यंत वेदनादायी आणि अतिशय दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) November 15, 2021
आम्हांला आणि आमच्यासारख्या करोडो लोकांना शिवराय खऱ्या अर्थाने समजले ते बाबासाहेबांमुळेच! नुकतीच पुण्यात त्यांची भेट घेतली होती, तेव्हा शतायुषी बाबासाहेब पुढेही त्यांच्या वाणीतून शिवराय जिवंत करत राहतील ज्यातून आणखी एक पिढी घडेल, असा ठाम विश्वास होता.
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) November 15, 2021
नारायण राणे, केंद्रीय मंत्री
“ज्येष्ठ इतिहास संशोधक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे जाणे ही अवघ्या महाराष्ट्राची खूप मोठी हानी आहे. बाबासाहेबांना माझी विनम्र श्रद्धांजली.”
ज्येष्ठ इतिहास संशोधक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे जाणे ही अवघ्या महाराष्ट्राची खूप मोठी हानी आहे. बाबासाहेबांना माझी विनम्र श्रद्धांजली.
— Narayan Rane (@MeNarayanRane) November 15, 2021
भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल
लोककल्याणकारी छत्रपती शिवरायांचे चरित्र आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत जागविणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे उत्तुंग प्रतिभेचे अलौकिक व्यक्तित्व होते. त्यांचे भावविश्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी भारावले होते. त्यांच्या प्रत्येक श्वासात महाराजांचा ध्यास होता. शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या लिखाणातून, व्याख्यानांमधून तसेच ‘जाणता राजा’ सारख्या महानाट्यामधून त्यांनी जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे पुण्यकार्य केले.
अलीकडेच शिवसृष्टी येथे भेट दिली असताना व त्यानंतर एका पुरस्कार सोहळ्यासाठी ते राजभवन येथे आले असताना त्यांच्यासोबत चर्चा करण्याचे भाग्य लाभले. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने भारतवर्षाच्या आसमंतातील एक तेजस्वी शिवतारा निखळला आहे. त्यांच्या स्वप्नातील शिवसृष्टी साकारणे व शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वदूर पोहोचविणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
महाराष्ट्रात येऊन शिवशाहिर बाबासाहेब यांचा घनिष्ट परिचय होणे व त्यांचा स्नेह आपणांस मिळणे ही आपली जीवनातली एक मोठी उपलब्धी आहे असे आपण मानतो. त्यामुळे त्यांचे निधन हे आपल्याकरिता वैयक्तिक स्तरावर देखील दुःखदायक आहे. या दुःखद प्रसंगी आपल्या तीव्र शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना तसेच त्यांच्या चाहत्यांना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
संजय राऊत, खासदार, शिवसेना नेते
विनम्र श्रद्धांजली..
आपण आमचे जीवन समृद्ध केलेत! महाराष्ट्र सदैव अपल्या ऋणात राहील!!!
विनम्र श्रद्धांजली..
आपण आमचे जीवन समृद्ध केलेत! महाराष्ट्र सदैव अपल्या ऋणात राहील!!! pic.twitter.com/mIkF8cIi7s— Sanjay Raut (@rautsanjay61) November 15, 2021
चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजपा
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र सोप्या व रंजक भाषेत जनसामान्यांना समजावून देणारा आणि शिवचरित्राच्या अभ्यासासाठी आयुष्य समर्पित केलेला महान उपासक गमावला आहे.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आयुष्यभर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरीत्राचा अभ्यास करण्याचा ध्यास घेतला. त्यांनी असंख्य ग्रंथ अभ्यासले, गड किल्ल्यांना भेटी दिल्या आणि सरदार घराण्यांकडून माहिती घेतली. अभ्यासाच्या आधारे त्यांनी शिवचरित्र अत्यंत सोप्या आणि रंजक पद्धतीने लोकांसमोर मांडले.
महाराष्ट्रातील अनेक पिढ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्याची जाणीव करून देण्याचे आणि त्यांच्यात शिवप्रेरणा जागविण्याचे कार्य बाबासाहेबांनी केले. राजा शिवछत्रपती या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी लाखो घरांपर्यंत शिवचरित्र पोहचविले. जाणता राजा या महानाट्याची निर्मिती करून त्यांनी शिवचरित्र नाट्यमय पद्धतीने समजावून दिले.
आयुष्यभर शिवचरित्राची उपासना करणाऱ्या या महान उपासकाला भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्कार देऊन तर महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरविले. त्यांना भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रतर्फे विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो.
प्रविण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद
शिवरायांसाठी आयुष्य वाहून घेणारे, इतिहासकार, नाटककार, लेखक अशी विविध क्षेत्रे आपल्या प्रतिभेने गाजवणारे आणि त्यांना अजरामर करणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या जाण्याने केवळ साहित्य क्षेत्रातच नाही तर इतिहास, नाट्य क्षेत्राचीही मोठी हानी झाली आहे. शिवचरित्र सहज सोप्या भाषेत उलगडवून दाखवणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, जाणता राजा उपाधीने छत्रपतीना गौरवस्थान प्राप्त करून देणारे बाबासाहेब यांचा काही दिवसांपूर्वीच वयाची ९९ वर्षे पूर्ण केल्याचा आणि शंभरीत पदार्पण केल्याचा सोहळा पडला होता. त्यावेळी असे काही घडेल असे वाटलेही नव्हते. केवळ शिवभक्तच नाही तर इतर सर्व क्षेत्रातील कोणीही त्यांना कधीही विसरू शकणार नाहीत. आपल्या कार्यकर्तुत्वाने ते अमर झाले आहेत. अशा थोर बाबासाहेबाना माझ्यातर्फे विनम्र श्रद्धांजली, असं विधानपरीषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.
मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे
“महाराष्ट्राच्या कणाकणात असलेल्या छत्रपती शिवरायांच्या जाज्ज्वल्य इतिहासाचं स्फुल्लिंग मराठीजनांच्या मनामानात चेतवणारे शिवशाहीर वंदनीय बाबासाहेब पुरंदरे यांची आज पहाटे 5.07 वा. प्राणज्योत मालवली. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.”
वंदनीय शिवशाहिरांना भावपूर्ण श्रद्धांजली !
महाराष्ट्राच्या कणाकणात असलेल्या छत्रपती शिवरायांच्या जाज्ज्वल्य इतिहासाचं स्फुल्लिंग मराठीजनांच्या मनामानात चेतवणारे शिवशाहीर वंदनीय बाबासाहेब पुरंदरे यांची आज पहाटे ५:०७ वा. प्राणज्योत मालवली. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. pic.twitter.com/1qb2buqZ0z
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) November 15, 2021
नितेश राणे, आमदार, भाजपा
वंदनीय बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली
वंदनीय बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻🙏🏻
— nitesh rane (@NiteshNRane) November 15, 2021
चित्रा वाघ, प्रदेशाध्यक्ष, भाजपा महिला मोर्चा
चित्रा वाघ म्हणाल्या की, “ज्येष्ठ इतिहासकार पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे त्यांनी अत्यंत रसाळ शैलीत आणि ओघवत्या भाषेत श्री शिवराय घराघरात पोहोचवण्याचे कार्य केले ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो..!!”
ज्येष्ठ इतिहासकार पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे त्यांनी अत्यंत रसाळ शैलीत आणि ओघवत्या भाषेत श्री शिवराय घराघरात पोहोचवण्याचे कार्य केले
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो..!!
ॐ शांती…🙏#शिवशाहीर #शिवशाहीर_बाबासाहेब_पुरंदरे pic.twitter.com/KZbLUaV7sg
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 15, 2021