Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

विधान परिषदेच्या मुंबई मतदारसंघातील दोन जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

November 13, 2021
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Shri Nivatkar sir

मुक्तपीठ टीम 

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या ५ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून रिक्त होणाऱ्या ६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याअनुषंगाने मुंबई मतदारसंघाकरिता दोन सदस्यांची मुदत दिनांक १ जानेवारी २०२२ रोजी समाप्त होत असल्याने बृहन्मुंबईत  दिनांक ९ नोव्हेंबर २०२१ पासून तात्काळ प्रभावाने आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजीव निवतकर यांनी दिली.

 

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ५ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या ६ सदस्यांपैकी सर्वश्री रामदास गंगाराम कदम आणि अशोक अर्जुनराव उर्फ भाई जगताप या सदस्यांची मुदत दिनांक १ जानेवारी २०२२ रोजी मुदत समाप्त होत आहे. निवडणुकीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.

 

निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक – १६ नोव्हेंबर २०२१ (मंगळवार), नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अखेरचा दिनांक – २३ नोव्हेंबर २०२१ (मंगळवार), नामनिर्देशन पत्रांची छाननी – २४ नोव्हेंबर २०२१ (बुधवार), उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक २६ नोव्हेंबर २०२१ (शुक्रवार), मतदानाचा दिनांक – १० डिसेंबर २०२१ (शुक्रवार), मतदानाची वेळ – सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत, मतमोजणीचा दिनांक – १४ डिसेंबर २०२१ (मंगळवार) आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक – १६ डिसेंबर २०२१ (गुरूवार).

 

आयोगाने नमूद केल्याप्रमाणे कोरोना संदर्भातील विस्तृत मार्गदर्शक तत्वे तसेच यासंदर्भात अलीकडेच दिनांक २८ सप्टेंबर २०२१ च्या मार्गदर्शक सूचनांमधील परिच्छेद क्र.६ मध्ये नमूद केलेल्या सूचनांचे निवडणूक प्रक्रियेत भाग घेणाऱ्या व्यक्तींनी पालन करणे आवश्यक असल्याचेही निवतकर यांनी सांगितले.


Tags: District Election OfficerElection Commission of IndiaMaharashtra Legislative Council ElectionRajeev Niwatkarजिल्हा निवडणूक अधिकारीभारत निवडणूक आयोगमहाराष्ट्र विधान परिषद निवडणूकराजीव निवतकर
Previous Post

नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये इंजिनीअरिंग पदांवर १८३ जागांसाठी भरती

Next Post

नवमतदारांनी मतदार नोंदणी मोहिमेत सहभागी होण्याचे जिल्हाधिकारी राजीव निवतकरांचे आवाहन

Next Post
rajeev niwatikar

नवमतदारांनी मतदार नोंदणी मोहिमेत सहभागी होण्याचे जिल्हाधिकारी राजीव निवतकरांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!