मुक्तपीठ टीम
नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये ज्युनियर इंजिनीअरिंग असिस्टंट (प्रोडक्शन) या पदासाठी ८७ जागा, ज्युनियर इंजिनीअरिंग असिस्टंट (इन्स्ट्रुमेंटेशन) या पदासाठी १५ जागा, ज्युनियर इंजिनीअरिंग असिस्टंट (इलेक्ट्रिकल) या पदासाठी ७ जागा, अटेंडंट ग्रेड-१ (मेकॅनिकल) या पदासाठी १७ जागा, अटेंडंट ग्रेड-१ (इलेक्ट्रिकल) या पदासाठी १९ जागा, लोको अटेंडंट ग्रेड-३ या पदासाठी १९ जागा, लोको अटेंडंट ग्रेड-२ या पदासाठी ४ जागा, मार्केटिंग रेप्रेसेंटेटिव्ह या पदासाठी १५ जागा अशा एकूण १८३ जागांवर ही भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १७ नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- बी.एससी (पीसीएम) किंवा केमिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा.
- पद क्र.२- इन्स्ट्रुमेंटेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन अॅंड कंट्रोल/इलेक्ट्रॉनिक्स अॅंड इंस्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन अॅंड कंट्रोल अॅंड इंडस्ट्रियल इन्स्ट्रुमेंटेशन/ प्रोसेस कंट्रोल इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स अॅंड इलेक्ट्रिकल/ अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स अॅंड इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड कंट्रोल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रुमेंटेशन अॅंड प्रोसेस कंट्रोल इंजिनीअरिंग डिप्लोमा
- पद क्र.३- इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल अॅंड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग डिप्लोमा
- पद क्र.४- १) १०वी उत्तीर्ण २) आयटीआय (इलेक्ट्रिशियन)
- पद क्र.५- १) १०वी उत्तीर्ण २) आयटीआय (फिटर)
- पद क्र.६- १) १०वी उत्तीर्ण २) आयटीआय (मेकॅनिक डिझेल)
- पद क्र.७- मेकॅनिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा
- पद क्र.८- बी.एससी (कृषी) असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३० वर्षांपर्यंत असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून २०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, इतर वर्गातील उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://www.nationalfertilizers.com/ वरून माहिती मिळवू शकता.