मुक्तपीठ टीम
यावर्षीच्या सुरुवातीला आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये विधानसभा निवडणूका झाल्या. यामध्ये भाजपाला आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये भरघोस यश मिळालं मात्र या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने चांगलाच पैसा खर्च केला आहे. भाजपाने निवडणुकी प्रचारावर २५२ कोटी रुपये खर्च केला आहे. जवळपास ६० टक्के तृणमूल काँग्रेस शासित राज्यात प्रचारासाठी वापरले. सर्वाधिक खर्च केलेल्या बंगालमध्ये भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागले होते.
पाच राज्यांच्या निवडणुका, भाजपाचा २५० कोटींचा खर्च!
- भाजपाने निवडणूक आयोगाला सादर केलेल्या खर्चाच्या तपशिलानुसार, पक्षाने या पाच राज्यांच्या प्रचारात २५२ कोटी ०२ लाख ७१ हजार ७५३ रुपये खर्च केले आहेत.
- बंगालमध्ये भाजपाने १५१ कोटी रुपये खर्च केले.
- तेथे आटोकाट प्रयत्नांनंतरही ममतांच्या तृणमूल काँग्रेसने बाजी मारली.
- आसाममध्ये ४३.८१ कोटी रुपये खर्च केले, तेथे भाजपाने सत्ता राखली.
- पुद्दुचेरीमध्ये ४.७९ कोटी रुपये खर्च केले, तेथे भाजपासह प्रादेशिक पक्षांची सत्ता आली.
- तामिळनाडूमध्ये पक्षाने २२.९७ कोटी रुपये खर्च केले, तेथे द्रमुकने भाजपाच्या मित्रपक्ष अण्णा द्रमुकची सत्ता हिरावून घेतली.
- तामिळनाडूत भाजपाला केवळ २.६ टक्के मते मिळाली आहेत.
सर्वाधिक आर्थिक ताकद असलेला पक्ष हा भाजपच आहे. इलेक्टोरल बॉन्डप्रणाली मोदी सरकारने निर्माण केली, त्यात स्वतःची आर्थिक ताकद वाढण्याबरोबरच इतर पक्षांना मदत मिळू नये हा उद्देश होता. एकाधिकारशाहीतून केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशीही केली जात नाही. म्हणून भाजपा अनधिकृत खर्चही प्रचंड करते https://t.co/eQrrRn40UW
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) November 12, 2021
ममतांच्या पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा सर्वाधिक खर्च! पण तृणमूलही पुढेच!
- पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसला सत्तेवरून घालवण्यासाठी भाजपाने सर्वतोपरी प्रयत्न केले.
- या राज्यात पक्षाने १५१ कोटी रुपये खर्च केले.
- केरळमध्ये, जिथे डावी लोकशाही आघाडी (एलडीएफ) आपली सत्ता वाचवण्यात यशस्वी ठरली, तिथे भाजपने २९.२४ कोटी रुपये खर्च केले.
- विविध पक्षांनी सादर केलेल्या खर्चाचा तपशील निवडणूक आयोगाने सार्वजनिक केला आहे.
- तृणमूल काँग्रेसने सादर केलेल्या खर्चाच्या तपशिलानुसार, पश्चिम बंगालमध्ये भाजपापेक्षा थोडे अधिक म्हणजे १५४.२८ कोटी रुपये खर्च केले.