मुक्तपीठ टीम
उद्योगपती आनंद महिंद्रांच्या नेतृत्वाखालील महिंद्रा समूह हा त्यांच्या कार्यक्षेत्रात नेहमीच वेगळे प्रयोग करु शकतो. वाहन निर्मिती क्षेत्रात या समुहाची कामगिरी ही जागतिक दर्जाची आहे. एक्सयूव्ही३०० ला ग्लोबल एनकॅपकडून फाइव्ह-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले होते, तर नवीन पिढीच्या थारला चार स्टार मिळाले आहेत. या यादीमध्ये अलीकडेच लाँच झालेली महिंद्रा एक्सयूव्ही७०० चा ही समावेश आहे. आता ग्लोबल एनकॅप क्रॅश चाचण्यांमध्ये या नव्या गाडीने फाइव्ह स्टार रेटिंग मिळवले आहे. या जबरदस्त एसयूव्हीने एडल्ट ऑक्यूपेंट प्रोटेक्शनच्या कॅटेगरीमध्ये १७ पैकी १६.०३ गुण मिळवले आणि बाल व्यावसायिक संरक्षण कॅटेगरीमध्ये ४९ पैकी ४२ गुण मिळाले आहेत.
महिंद्रा एक्सयूव्ही७०० चे लेटेस्ट फिचर्स
- चाचणी केलेल्या मॉडेलमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, एबीएस
- सीटबेल्ट रिमाइंडर, फ्रंट सीटबेल्ट प्रीटेन्शनर्स आहेत.
- तसेच आयएसओफिक्स अँकरेजसह लेस एंट्री-लेव्हल व्हेरिएंट होते.
- महिंद्राने सुरक्षेसाठी या सर्वोच्च स्कोअरसह एक मोठा टप्पा गाठला आहे.
- सेफ्टीचा पर्याय म्हणून ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग हा पर्याय ऑफर करणारी महिंद्रा पहिली भारतीय बनावटीची आणि मालकीची उत्पादक आहे.
जबरदस्त! सुरक्षित!
- नवीन महिंद्रा एक्सयूव्ही७०० दोन इंजिन पर्यायांसह सादर केली जाईल.
- ज्यामध्ये २.० लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल आणि २.२ लीटर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिनचा समावेश आहे.
- डिझेल इंजिन एमएक्स ट्रिम १५३बीएचपी आणि ३६०एनएम टॉर्क आहे.
- १८२बीएचपी आणि ४२०एनएम टॉर्क असे दोन स्टेट ऑफ ट्यून देते.
- पेट्रोल इंजिनमध्ये १९७बीपीएच आणि ३८०एनएम टॉर्क निर्माण करण्याची क्षमता आहे.
- डिझेल इंजिन झीप, झॅप, झूम आणि कस्टम अशा ४ ड्रायव्हिंग मोडसह ऑफर केले जाईल.
महिंद्रा एक्सयूव्हीचे ७० हजारांहून अधिक बुकिंग भारतात झाले आहे. महिंद्राच्या या एसयूव्हीला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.