मुक्तपीठ टीम
खासगी क्षेत्रातील इंडसइंड बँकेने आपल्या ग्राहकांना संमतीशिवाय कर्ज दिले आहे. बॅंकेने आपली चूकही मान्य केलेली आहे. मे महिन्यात तांत्रिक बिघाडामुळे ८४ हजार ग्राहकांना त्यांच्या संमतीविना कर्ज देण्यात आल्याचे बँकेने मान्य केले आहे.
खाजगी क्षेत्रातील या बँकेने स्पष्ट केले की, फील्ड कर्मचार्यांनी ग्राहकांना दोन दिवसात संमतीविना कर्ज दिल्याची माहिती दिली होती, त्यानंतर त्रुटी त्वरित सुधारण्यात आल्या होत्या.
लोन एव्हरग्रीनिंगबाबत सविस्तर माहिती
- इंडसइंड बँकेने ‘लोन एव्हरग्रीनिंग’वरील व्हिसलब्लोअरचे दावे पूर्णपणे खोटे आणि निराधार असल्याचे म्हटले आहे.
- लोन एव्हरग्रीनिंग म्हणजे डिफॉल्टच्या मार्गावर असलेल्या कर्जाचे नूतनीकरण करण्यासाठी फर्मला नवीन कर्ज देणे.
मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात व्हिसलब्लोअरने काही अटींसह कर्जाच्या नूतनीकरणासाठी म्हणजेच लोन एव्हरग्रीनिंगसाठी इंडसइंड बँकेची उपकंपनी असलेल्या बीएफआयएलद्वारे दिलेल्या अशा कर्जाबाबत बँक व्यवस्थापन आणि भारतीय रिझर्व्ह बँकेला पत्र लिहिले आहे. अशाप्रकारे, जेथे विद्यमान ग्राहक त्यांचे कर्ज फेडण्यास असमर्थ होते, त्यांना नवीन कर्ज दिले गेले, जेणेकरून त्यांचे बॅंक खाते सुरक्षित राहील.
या आरोपांवर बँकेने म्हटले आहे की, आम्ही लोन एव्हरग्रीनिंगचे आरोप पूर्णपणे नाकारतो. बीएफआयएलद्वारे जारी केलेले आणि व्यवस्थापित केलेले कर्ज नियामकाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पूर्णपणे पालन केल्यानंतरच मंजूर केले गेले. यामध्ये कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या उद्रेकादरम्यान दिलेल्या कर्जाचाही समावेश आहे.