मुक्तपीठ टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी रविवारी फॅशन टीव्हीच्या कशिफ खानचा कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांना क्रुझ पार्टीला बोलवून गोवण्याचा कट होता, असा गौप्यस्फोट केला. त्यानंतर त्यांचा धागा उचलत भाजपाचे नेते मोहित कंबोज उर्फ भारतीय यांनी अस्लम शेख – कशिफ खान यांच्या संबंधांच्या चौकशीची मागणी केली. त्यामुळे अडचणीत आलेले कॅबिनेट मंत्री, काँग्रेसचे नेते अस्लम शेख यांनी काशिफ खानला ओळखत नसल्याचा दावा केला.
काय म्हणाले अस्लम शेख?
- पालकमंत्री अस्लम शेख यांनी पत्रकार परिषद घेऊन काशिफ खानच्या आमंत्रणावर प्रतिक्रिया व्यक्त केली.
- मी काशिफ खान नावाच्या व्यक्तीला ओळखत नाही.
- त्याला मी कधीच भेटलो नाही.
- त्याने मला पार्टीला बोलावलं होतं.
- मी पालकमंत्री आहे.
- त्यामुळे अनेक लोक लग्न सोहळे, वाढदिवसाला मला बोलवत असतात. त्याचप्रमाणे मला या पार्टीचंही आमंत्रण होतं.
- या प्रकरणात षडयंत्र होतं की नाही याचा एजन्सी तपास करत आहे.
काशिफशी फोनवर संभाषण झालं नाही!
- काशिफ खानकडे माझा नंबर आहे की नाही मला माहीत नाही.
- माझा मोबाईल पीएकडे असतो.
- तो एका ठिकाणी मला भेटला होता.
- तो तिथे कसा आला मला माहीत नाही.
- त्याने मला भेटून पार्टीचं निमंत्रण दिलं होतं.
- आता त्या पार्टीत काय होणार होतं.
- मला माहीत नाही.
- हे तपास यंत्रणेने शोधावं.
- काशिफशी फोनवर संभाष झालं नाही.
- संभाषण झाल्याचं मला आठवत नाही.
- त्याने भेटून आमंत्रण दिलं होतं हे मात्र नक्की.
ज्या कार्यक्रमात जातच नाही, त्याची माहिती घेत नाही
- दिवसभरात मला ५० लोक मला आमंत्रित करतात.
- एखाद्या लग्नात गेलो तर लोकं वाढदिवसाचंही निमंत्रण देत असतात.
- मी ज्या कार्यक्रमात जातो.
- त्याची माहिती घेत असतो.
- जिथे जातच नाही, त्याची माहिती घेत नाही.
- मला वाटतं ज्या कार्यक्रमाला जायचं नाही त्याची माहिती घेणंही योग्य नाही.
गुजरातची चर्चाच नाही!
- गुजरातमध्ये २० हजार कोटीचं ड्रग्ज पकडलं त्याची चर्चाच नाही
- ही केस जशी चालली.
- सुरुवातीला हे ड्रग्ज प्रकरण वाटत होतं.
- शाहरुख खानच्या मुलाचं नाव आल्यानंतर मीडियाने त्याचं कव्हरेज सुरू केलं.
- त्याचवेळी गुजरातमध्ये २० हजार कोटीचं ड्रग्ज पकडलं त्यावर चर्चा झाली नाही, याकडेही त्यांनी मीडियाचं लक्ष वेधलं.
- एका मुलाला नशामुक्ती केंद्रात पाठवायला हवं होतं की नाही हे तपासायला हवं होतं.
- मीडियानेही तपास करायला हवा होता.
नवाब मलिकांनी केला होता अस्लम शेख यांना पार्टीसाठी आग्रहाचा आरोप!
- कॉर्डेलिया क्रूझवर पार्टीचे आयोजन करणाऱ्या काशिफ खानने मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनाही क्रुझ पार्टीचं आमंत्रण दिलं होते.
- शेख यांनी पार्टीत सहभागी व्हावं, यासाठी तो सतत आग्रह करत होता.
- तो राज्यातील मंत्र्यांच्या मुलांनाही फसवून त्या पार्टीत नेण्याचा प्रयत्न करत होता.
- या काशिफ खानला एनसीबीनं का पकडलं नाही?
- अस्लम शेख यांना तो तिथं का बोलवत होता?
- मंत्र्यांच्या मुलांना तो का ट्रॅप करत होता?
- ड्रग्जचा खेळ राज्य सरकार चालवतंय असं तर यांना दाखवायचं नव्हतं ना?
भाजप नेते मोहित कंबोज यांनी केली होती चौकशीची मागणी
- अस्लम शेख आणि काशिफ खानचे संबंध होते हा माझा आरोप नाही. नवाब मलिक यांचा आहे.
- मी फक्त कोणता मंत्री यात सामील आहे असा प्रश्न विचारला होता? मी कुणाचंही नाव घेतलं नाही. मलिक यांनीच नाव घेतले, असे कंबोज म्हणाले.
- कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांना काशिफ खानकडून वारंवार पार्टीचे आमंत्रण कसे?
- ओळख नसलेला माणूस एकदा अमंत्रित करेल, परंतु ओळख नसेल तर वारंवार कसे बोलावेल?
- एका कॅबिनेट मिनिस्टरला अनोळखी माणूस वारंवार फोर्स कसा करू शकतो?
- अस्लम शेख यांचे कॉल रेकॉर्ड चेक केले पाहिजे. नवाब मलिकांनी अस्लम शेख यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत.
- अस्लम शेखचाही काशिफ सोबत संबंध होते त्यांचेही कॉल रेकॉर्ड चेक झाले पाहिजे असे नवाब मलिक म्हणाले.
- नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन हे नवे गौप्यस्फोट केले आहेत.
- या गौप्यस्फोटानंतर मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेऊन पलटवार केला आहे.