मुक्तपीठ टीम
अँटिलिया प्रकरणातील फरार मुख्य आरोपी आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग याच्या सांगण्यावरून सचिन वाझे क्रिकेट बुकींकडून मोठी रक्कम वसूल करत असल्याचे आरोप क्राइम ब्रांचने बडतर्फ मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या रिमांड सुनावणीदरम्यान केला आहेत.
यामध्ये सचिन वाझे हे बुकींना अटक करण्याची धमकी देऊन ही खंडणी करत असल्याचे समोर आले. न्यायालयाने वाझे यांना १३ नोव्हेंबरपर्यंत क्राइम ब्रांचच्या ताब्यात दिले आहे.
क्राइम ब्रांचने वाझेला आणखी सात दिवसांची कोठडी मागितली आहे. रिमांड अर्जात क्राइम ब्रांचने स्पष्ट केले की, सचिन वाजे हा परमबीर सिंगचा खास असल्याने तो सध्या कुठे आहे, याचीही माहिती घ्यायची आहे. हे सर्व कसे घडवून आणले, वसुली करण्याची युक्ती कोणाची होती, पैसे कुठे जमा केले आहेत हे देखील आम्हाला जाणून घ्यायचे आहे. आणखी कोणाकडून खंडणी वसूल करण्यात आली आहे का, याशिवाय त्या पैशाचे काय केले, उर्वरित फरार आरोपींमध्ये ही रक्कम कशी वाटली गेली, याचाही शोध घ्यायचा आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
या प्रकरणात अल्पेश पटेलला गुजरातमधील मेहसाणा येथून अटक करण्यात आले. फरार असताना ज्या फोनवरून त्यांचे बोलने होत असे तो फोन आणि सीमकार्ड नष्ट केल्यामुळे त्याच्यावर पुरावे नष्ट केल्याचा आरोप आहे.
वाझे यांचे वकील रौनक नाईक यांनी त्यांच्या अशिलाला तपासात सहकार्य करायचे असल्याचे सांगत रिमांड अर्जाला विरोध केला नाही.