मुक्तपीठ टीम
कोरोनामुळे एकंदर जीवनावर आलेलं मळभ आता ओसरू लागलं आहे. दिवाळीच्या प्रकाशोत्सवात मंदीचं तिमिर हटताना दिसत आहे. भारतात धनत्रयोदशीला एका दिवसात १५ हजार किलो सोन्याची खरेदी झाली आहे. त्यासाठी ग्राहकांकडून ७५ हजार कोटी खर्च करण्यात आले आहेत.
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT)च्या माहितीनुसार ज्वेलरी उद्योग कोरोना महामारीमुळे आलेल्या मंदीतून सावरला आहे. CAITने जारी केलेल्या निवेदनानुसार, “धनत्रयोदशीच्या दिवशी देशभरात सुमारे ७५,००० कोटी रुपयांची विक्री झाली. सुमारे १५ हजार किलो सोन्याच्या दागिन्यांची विक्री झाली.”
सर्वात जास्त सोने खरेदी महाराष्ट्रात!
- महाराष्ट्र – १, ५०० कोटी
- दिल्ली – १,००० कोटी
- उत्तर प्रदेश – ६०० कोटी
- दक्षिण भारत – अंदाजे २,००० कोटी
सोने खरेदी कसली?
- सोन्याचे दागिने
- सोन्याच्या नाणे
- हलक्या सोन्याच्या उत्पादनांची मागणी वाढली
- ऑफलाइन खरेदी पुन्हा सुरु झाल्याचे प्रतिबिंब ज्वेलरी दुकानांवर ग्राहकांची वाढलेली गर्दीतून दिसून आले.
- गेल्या दिवाळीच्या तुलनेत दुकानाला भेट देणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. साधारणपणे धनत्रयोदशीच्या दिवशी २० ते ३० हजार किलो सोन्याची विक्री होते.
अधिक मागणी अपेक्षित!
- किंमतीत नरमाई आणि चांगला मान्सून ज्वेलर्ससाठी चांगले संकेत देत आहे.
- या धनत्रयोदशीच्या काळात मागणी गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगली आहे.
- कोरोनामुळे ग्राहकांनी गेल्या दोन वर्षांत खरेदी केली नाही.
- आता परिस्थिती सामान्य झाल्यामुळे लोक बाहेर पडत आहेत आणि खरेदी करत आहेत.
- येणाऱ्या काळात ही मागणी अधिक वाढण्याची शक्यता आहे.