रोहिणी ठोंबरे
रोहिणी ठोंबरे या मुक्तपीठ टीममधील पत्रकार आहेत. पत्रकारितेच्या धकाधकीतही त्या कवितेची आवड जोपासतात.
माझी आई
सर्वांपेक्षा वेगळी माया, ती म्हणजे माझ्या आईची,
रागावूनही जवळ करणारी ती माझी आई
दुनियेची कदर न करता माझ्या पाठीशी उभी राहणारी,
सर्व दुःख स्वतः सहन करून शक्ती देणारी ती माझी आई
रागात बाबांचा डोळा चुकवून खाऊला पैसे देणारी,
परंतु कमी पैशात उत्तम घर चालवणारी ती माझी आई
तीची माया तर गगनात मावेनाशी अफाट,
पण आपण तीच प्रेम कधी घेतो का समजून?
सर्व गोष्टीत राहते ती नेहमी पाठी,
पण तीच्या मनात तीची मुले असतात नेहमी पहिली तीच माझी आई
आईचे मन हे स्वच्छ, निर्मळ पाण्यासारखे असते,
अगदी पारदर्शक परंतु, कोणी तीचे मन समजून होतं का?
आईचं कौतुक आणि प्रेम लिहायला शब्द नाही
कारण जी प्रेम करते तीच माझी आई