रोहिणी ठोंबरे
रोहिणी ठोंबरे या मुक्तपीठ टीममधील पत्रकार आहेत. पत्रकारितेच्या धकाधकीतही त्या कवितेची आवड जोपासतात.
कमीपणा
एखाद्याला इतकं कमी लेखू नका,
की त्याचं मन दुखावलं जाईल
आपुलकीने संवाद साधा,
कधीकाळी तोच तुमच्या उपयोगी येईल
प्रेमाने दोन शब्द बोलून तर बघा,
दुसऱ्यांच्या नजरेत आपल्यासाठी असलेला कमीपणा दूर होईल
मैत्री, नाती ही विश्वासाने आणि प्रेमाने बनतात,
कमीपणाने तर नाती दूरावली जातात
आपुलकी, माया, प्रेम हीच जीवनाचे मुख्य कारणे,
कमीपणाने तर नाती दूर लोटली जातात