किरण कृष्णा जंगम
किरण जंगम हे काव्य लेखन करतात. ते माध्यम क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. एका जाहिरात संस्थेमध्ये कॉपीराइटिंगच काम करतात. त्यांना कथा लेखनही आवडतात.
निरंजन
सांज समयी दीपसमान ती
लखलखली त्याच्या मनी,
दोन जिवांच्या भेटीची ही
समीप आली घडी।
श्रुंगाराने नटली ती
तो ही मोहन झाला,
आकाशाने मिटले डोळे
चंद्र राहिला साक्षीला।
ओठांवरचे ते ओले क्षण
पुसण्याचे कैक यत्न केले,
स्पर्श होताच अलगद ओठांवर
ते अवकाश साधून गेले।
नव्हते मायेचे वस्त्र अंगावरी
नव्हते कपट काही,
एकमेकांसी सर्वस्व वाहुनी
नुरले अतृप्त काही।
प्रभातकाळी श्रुंगारराणी
पुन्हा पतिव्रता झाली,
सांज समयीचा दीप निजूनी
पुन्हा निरांजन झाली