मुक्तपीठ टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीसह केंद्रीय यंत्रणांवर केलेले आरोप खूपच गंभीर आहेत. त्यामुळे आरोप करणारे नवाब मलिक यांची आणि त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले आहेत त्या सर्वांची नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे.
काय म्हणालेत आशिष शेलार?
- आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन नार्को टेस्टची मागणी केली आहे.
- नवाब मलिक यांनी यंत्रणांमधील ज्यांच्यावर आरोप केले ते गंभीर आहेत.
- शिवाय ते सरकारची ढाल पुढे करून न्यायालयात जाणे टाळतात.
- ना ते पोलीस यंत्रणेसमोर जात आहेत, ना शपथेवर न्यायालयासमोर काही दावा दाखल करीत आहेत.
का पाहिजे नार्को टेस्ट?
- आठ महिने ती माहिती त्यांच्याकडे होती, त्यांनी ती लपवली.
- त्यामुळे माननीय नवाब मलिक यांची आणि त्यांनी आरोप केले त्या यंत्रणामधील लोकांची सुद्धा नार्को टेस्ट व्हावी.
- राज्य सरकारने दोन्ही बाजूंच्याची टेस्ट करावी.
- नार्कोपासून आरोप करणाऱ्यांना लपवालपवी करणाऱ्यांना आणि ज्यांच्यावर गंभीर आरोप केले त्याला या दोघांना समान पद्धतीने राज्य सरकारने वागवलं नाही तर यात राज्य सरकारमध्ये बसलेल्या अन्य लोकां विषयीचा संशय बळावेल. त्यामुळे दोघांचीही टेस्ट करा, समान न्याय द्या.
गुन्हेगारीविषयी माहिती दडवणे फौजदारी गुन्हा?
- आर्यन खानला अटक झाल्यानंतर जी माहिती मंत्री महोदय देत आहेत याचा बहुतांश गोष्टी आणि माहिती या आर्यन खान यांना झालेल्या अटकेनंतरच्या नाहीत.
- ही सर्वसाधारण दिलेली माहिती आहे. तुम्ही माहिती लपवण्यासाठी शपथ घेतली होती का? माहिती लपवण्याचे कारण काय? याचे उत्तर मलिक यांनी द्यायला हवे.
- ही माहिती नवाब मलिक यांचा जावई आठ महिने अटकेत असताना त्यांना होती ना?
- तुम्ही ती लपवून का ठेवली?
- राज्यपाल महोदयांसमोर तुम्ही काय शपथ घेतली. गुन्हे, गुन्हेगारी आणि गुन्हेगार संबंधात माहिती लपवण्याची शपथ आपण घेतली होती का?
- ही बाब आता राज्यपाल महोदयांनीही तपासली पाहिजे.
- या प्रश्नांचे उत्तर मंत्री नवाब मलिक यांनी दिलं पाहिजे.
- त्यांनी घेतलेल्या शपथेचा भंग केला असून गुन्हेगारी आणि गुन्हा कार्यपद्धती संबंधीची माहिती लपवणे हा फौजदारी गुन्हा आहे का? याबद्दलची सुद्धा स्पष्टता झाली पाहिजे.
वानखेडेंना प्रमाणपत्रं देण्याचं काम भाजपाचं नाही!
- सुरुवातीला आम्ही पुन्हा एकदा स्पष्ट करतो समीर वानखेडे यांना चारित्र्य प्रमाणपत्र देणं हे भाजपाचं काम नाही.
- ड्रग्सच्या विरोधात बिनतोड कारवाई केलीच पाहिजे.
- यात कोणाचाही मुलाहिजा ठेवण्याची आवश्यकता नाही, हीच भाजपाची मागणी आहे. त्यामुळे मुद्दाहून विषय कुठेतरी भरकटत नेण्याचा प्रयत्न आमच्या विरोधकांनी करु नये.
ड्रग्सविरोधात कारवाई झालीच पाहिजे!
- जिथे चरस, गांजा ड्रग्ज आणि त्यांच्या भाषेतला हर्बल तंबाखू कितीही प्रमाणात सापडला आणि तो कायद्याने गुन्हा असेल तर कारवाई झालीच पाहिजे.
- त्याच्या मोजमापावर कारवाई ठरत असेल तर ते आम्हाला मान्य नाही.
- ड्रग्ज अथवा तस्सम गोष्ट मिळाली तर कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे.
- कुणाचाही मुलाहिजा न ठेवता ही कारवाई व्हावीच!