मुक्तपीठ टीम
व्हॉट्सअॅप चॅट्सची प्रायव्हसी राहावी किंवा नको असलेले व्हॉट्सअप चॅट तुम्ही डिलीट केले असाल तरी ते तुमच्या अँड्रॉईड फोनच्या बॅकअपमध्ये राहतात. त्यामुळे गुगल ड्राईव्ह बॅकअपमध्ये असणारे व्हॉट्सअॅप चॅट्स डिलीट करणे गरजेचे आहे. कारण हे चॅट्सची गुगल अकाऊंटमधून ऍक्सेस केले जाऊ शकतात किंवा हॅक केले जाण्याची शक्यता आहे. ते चॅट डिलीट केल्याने गुगल ड्राईव्ह स्टोरेजमध्ये काही जागा मोकळी होऊ शकते, जी आता १५GB पर्यंत मर्यादित आहे. एकदा गुगल ड्राइव्हवरून तुमचे चॅट डिलीट केल्यानंतर त्याला पुनर्प्राप्त करण्याचा कोणताही मार्ग नाही.
गुगल बॅकअपमधून व्हॉट्सअॅप चॅट डिस्कनेक्ट करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:
- ब्राउझरवर drive.google.com वर जाऊन मोबाईल वापरत असाल, तर डेस्कटॉप वर्जनवर स्वीच करा.
- व्हॉट्सअॅप बॅकअप सिंक करण्यासाठी, फोनवर कॉन्फिगर केलेल्या गुगल आयडी आणि पासवर्डसह साईन इन करा.
- वरच्या उजव्या कोपऱ्यातून सेटिंग्ज मध्ये तुम्हाला तुमचे प्रोफाईल आणि अकाउंट पिक्चर दिसेल.
- डाव्या पॅनलवरील मॅनेज अॅप्स निवडा आणि व्हॉट्सअॅप मेसेंजर विभागात खाली स्क्रोल करा.
- पर्यायांवर क्लिक करा आणि डिस्कनेक्ट फ्रॉम ड्राइव्ह पर्याय निवडा.
- डिस्कनेक्ट प्रॉम्प्टसह कन्फर्म करा.
गुगल ड्राईव्हवरून व्हॉट्सअॅप बॅकअप हटवण्यासाठी खालील स्टेप्स फॅलो करा:
- डाव्या पॅनलवरील बॅकअप लिंकवर क्लिक करा.
- बॅकअप फाईल निवडा.
- वरती उजव्या बाजूला ‘बॅकअप हटवा’ बटण निवडा.
- तुम्हाला कन्फर्मेशन मेसेज मिळेल, डिलीटवर क्लिक करा.
गुगल ड्राइव्हमध्ये चॅटचा बॅकअप ठेवायचा नसेल तर खालील स्टेप्स फॉलो करा:
- व्हॉट्सअॅप उघडा.
- सेटिंग्जमध्ये जा.
- चॅट बॅकअपवर क्लिक करा.
- गुगल ड्राइव्हवर बॅकअप निवडा.
- पर्यायांमधून “Never”निवडा.
फोनच्या लोकल स्टोरेजमधून चॅट देखील हटवण्याचा पर्याय उपलब्ध:
- फोनवर, फाईल्स किंवा फाईल मॅनेजर उघडा.
- व्हॉट्सअॅप फोल्डरवर क्लिक करा, सर्व व्हॉट्सअॅप सबफोल्डर्सची सूची दिसेल.
- डेटाबेस फाईल क्लिक करा आणि होल्ड करा.
- डिलीट निवडा.
गेल्या आठवड्यात, व्हॉट्सअॅप ने एंड-टू-एंड एन्क्रिप्शन आणण्यास सुरुवात केली. अँड्रॉईड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मवर व्हॉट्सअॅप युजर्ससाठी एन्क्रिप्शन आणले जात आहे. एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड बॅकअप तयार करण्यासाठी, व्हॉट्सअॅपच्या लेटेस्ट वर्जनवर असल्याची खात्री करा. एकदा तुम्ही ते अपडेट केल्यानंतर, सेटिंग्ज > चॅट्स > चॅट बॅकअप > एंड-टू-एंड एनक्रिप्टेड बॅकअप उघडा आणि नंतर सूचनांना फॉलो करा.