मुक्तपीठ टीम
कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचे धक्कादायकरीत्या निधन झाले. आपल्या फिटनेससाठी ओळखले जाणारे सुपरस्टार राजकुमार यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पुनीत राजकुमार अवघ्या ४६ वर्षांचा होते.
- पुनीत राजकुमार यांच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन क्षेत्राला धक्का बसला आहे.
- बॉलीवूड सेलिब्रिटींपासून ते साऊथ इंडस्ट्रीपर्यंत लोक त्यांच्या निधनाचं कळताच शोक व्यक्त करत आहेत.
- पुनीत यांच्या मृत्यूची बातमी समजताच कर्नाटक सरकारने राज्यात हाय अलर्ट जाहीर केला आहे. पुनीत यांनी ३० हून अधिक कन्नड चित्रपटांमध्ये काम केले होते.
सकाळी रुग्णालयात, दुपारी मृत्यू झाला
- शुक्रवारी सकाळी पुनीत राजकुमारने छातीत दुखत असल्याची तक्रार केली.
- त्यानंतर लगेचच त्यांना बंगळुरू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
- पुनीत राजकुमार यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे रुग्णालयात तपासणी दरम्यान आढळून आले.
- उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
कर्नाटकात हाय अलर्ट!
- पुनीत राजकुमार यांना त्यांचे चाहते अप्पू आणि पॉवर हाऊस म्हणून ओळखत होते.
- सोशल मीडियावर पुनीत राजकुमारांच्या निधनाबद्दल पोस्ट्सचा पाऊस पडत आहे.
- यूजर्स सातत्यानं काहीतरी लिहित आहेत.
- त्यांच्या मृत्यूनंतर काही वेळातच कर्नाटक सरकारने राज्यात हाय अलर्ट जाहीर केला आहे. यासोबतच सर्व चित्रपटगृहे तातडीने बंद करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
- त्याचे चाहते रस्त्यावर येऊन त्यांनी भलतं काही करु नये म्हणून हे सावधगिरीचे पाऊल उचलण्यात आले आहे.