मुक्तपीठ टीम
मराठा आरक्षण प्रकरणी खासदार संभाजी छत्रपती यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्याचे महाअधिवक्ते कुंभकोणींवर संतापले आहेत. ते फक्त गोड बोलतात, करत काहीच नाहीत. त्यांना हिसका दाखवू, असा इशारा त्यांनी सोलापुरात बुधवारी झालेल्या जनसंवाद यात्रेत दिला आहे.
छत्रपती घराण्यात मॅनेज शब्द नाही!
संभाजी छत्रपती यांना मॅनेज केलं की विषय संपला असं म्हणणाऱ्यांनाही त्यांनी चांगलंच सुनावलं आहे. संभाजी छत्रपती म्हणाले की, आमच्या इतक्या सोप्या मागण्या आहेत, ज्या पूर्ण केल्या जात नाहीयेत मग आम्ही काय गप्प बसलोय काय? संभाजी छत्रपतींना मॅनेज केलं की विषय संपला असं काही जणांना वाटत असेल पण माझा जन्म छत्रपती घराण्यात झालाय, मॅनेज शब्द आमच्या जवळपास ही नाही असंही ते म्हणाले.
महाअधिवक्त्यांविरोधात संताप
- कुंभकोणी यांनी अजून आमचा हिसका पहिला नाही.
- सोलापुरात झालेल्या जनसंवाद यात्रेत संभाजीराजे छत्रपती यांची महाधिवक्ता कुंभकोणी यांच्यावर देखील टीका केली.
अॅटोर्नी जनरल कुंभकोणी प्रचंड गोड बोलत होते, मागील दोन महिन्यांपासून पठ्ठया फिरकला सुद्धा नाही, आणि फोन देखील करत नाही. - कदाचित अॅटोर्नी जनरल कुंभकोणी यांनी अजून आमचा हिसका पहिला नाही.
इंदिरा सहानी केसमुळे मराठा आरक्षण उडाले!
- केंद्र सरकारचं म्हणणं आहे की ते अधिकार राज्य शासनाला दिले आहेत.
- इंदिरा सहानी केसमुळे मराठा आरक्षण उडाले असल्याचं संभाजी छत्रपती म्हणाले.
- असामान्य परिस्थिती निर्माण झाली तर मराठा आरक्षण देता येऊ शकेल, असा इंदिरा सहानी केसमधील निकाल आहे.
- घटनादुरुस्ती वेळी मी पार्लमेंटमध्ये मला बोलू दिले गेले नाही, मी भांडलो, त्यानंतर माध्यमांसमोर बोललो. पार्लमेंटमध्ये ही टर्म बदलावी आणि मराठा समजासह इतर पटेल, गुर्जर इत्यादी समाजाच्या आरक्षणाच्या मार्ग मोकळा हो