मुक्तपीठ टीम
क्रूझ ड्रग्स प्रकरणी आर्यन खानला केलेल्या अटकेनंतर जगभरातील माध्यमांमध्ये गाजलेले एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणी आता वाढत आहेत. त्यांनीच स्वतंत्र साक्षीदार बनवलेल्या प्रभाकर साईल यांनी वानखेडेंसह इतरांवर २५ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप केला. त्यामुळे एनसीबीने अंतर्गत चौकशी सुरु केली असतानाच महाराष्ट्र सरकारनेही पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद खेतले यांनी चौकशीचे काम सुरु केले आहे. त्यामुळे बॉलिवूडमधील अनेकांच्या चौकशीतून सतत चर्चेत राहणारे समीर वानखेडेंमागेच आता चौकशीचा ससेमिरा लागला आहे.
सहाय्यक आयुक्त मिलिंद खेतलेंची समिती करणार चौकशी
- साईल यांच्या आरोपांची दखल घेत राज्य सरकारची वानखेडेंच्याविरोधात चौकशीची घोषणा
- आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्रं दाखल केलं.
- या प्रतिज्ञापत्रात त्याने धक्कादायक आरोप केले.
- शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला रिलीज करण्यासाठी २५ कोटी रुपयांची डील होणार होती.
- त्यातले ८ कोटी रुपये समीर वानखेडे यांना मिळणार होते.
- तसं फोनवरील संभाषण ऐकल्याचा दावा प्रभाकर साईलने केला.
- याच गंभीर आरोपांची दखल घेत राज्य सरकारने समीर वानखेडे यांच्याविरोधात चौकशीची घोषणा केली आहे.
वानखेंडेंविरोधात चार तक्रारी
- प्रभाकर साईल, अॅड सुधा द्विवेदी, अॅड कनिष्का जैन आणि अॅड नितीन देशमुख यांनी केलेल्या विविध तक्रार अर्जांची एकत्रित चौकशी करण्यासाठी ४ पोलिस अधिकाऱ्यांची नेमणूक राज्य सरकारकडून जाहीर केली गेली आहे.
- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकंनी समीर वानखेडे विरोधात अनेक गौप्यस्फोट केले.
- आता राज्य सरकारने वानखेडेंविरोधात चौकशी लावल्याने सरकार विरुद्ध वानखेडे असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
समीर वानखेडेंच्या चौकशीसाठी समिती
- मिलिंद खेतले- सहायक पोलिस आयुक्त
- अजय सावंत- पोलिस निरीक्षक
- श्रीकांत पारकर- सहायक पोलिस निरीक्षक
- प्रकाश गवळी- पोलिस उप निरीक्षक
मुंबई पोलिसांकडून वानखेडेंविरोधात चौकशी सुरु
- मुंबई पोलिसांनी वानखेडेवर अद्याप कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही.
- मात्र, पोलिसांकडे वानखेडेंविरोधात तक्रारी आल्या आहेत.
- वानखेडेविरोधात आलेल्या सर्व तक्रारींची खेतले यांनी चौकशी केल्याची पुष्टी आहे.
- त्याचबरोबर हा तपास अहवाल राज्याच्या गृहमंत्रालयाकडे पाठवण्यात येणार आहे.
- तेथून आदेश आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल.
प्रभाकर साईल यांचे आरोप
- आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्रं दाखल केलं आहे.
- त्यात त्यांनी अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत.
- “केपी गोसावी आणि सॅम डिसूझाचं मी फोनवरील संभाषण ऐकलं होतं.
- २५ कोटींचा बॉम्ब टाका.
- १८ कोटीपर्यंत डील फायनल करू.
- त्यातील ८ कोटी रुपये समीर वानखेडेंना देऊ”, असं या दोघांमध्ये संभाषण झाल्याचं साळी यांचा दावा आहे.
- आपण केपी गोसावी यांचे बॉडीगार्ड असल्याचा दावाही साईल यांनी केला आहे.
- त्यानंतर गोसावीने मला फोन केला आणि पंच म्हणून राहण्यास सांगितलं.
- एनसीबीने १० कोऱ्या कागदांवर माझी सही घेतली. तसेच मी गोसावींना ५० लाखांच्या दोन बॅगाही दिल्या होत्या.
- १ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजून ४५ मिनिटाने गोसावीने मला फोन केला होता.
- तसेच २ ऑक्टोबर रोजी ७.३० वाजेपर्यंत तयार राहण्यास मला सांगण्यात आलं.
- गोसावींनी मला काही फोटोही पाठवले होते.
- फोटोत जे लोक दिसत आहेत, त्यांचे हे फोटो मला दाखवण्यात आले होते.
- ग्रीन गेटवर याच लोकांची ओळख पटवण्यास सांगितल्याची धक्कादायक माहितीही साईल यांनी दिली आहे.