Friday, March 13, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अखेर किरण गोसावीला अटक! भाजपाच्या सत्तेतील गुन्हा, आघाडीच्या सत्तेत गजाआड!

October 28, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
kiran gosavi

मुक्तपीठ टीम

मुंबईतील क्रूझ पार्टी प्रकरणातील एनसीबीचा पंच किरण गोसावीला पुणे पोलिसांनी अखेर अटक केली आहे. किरण गोसावी याच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. किरण गोसावी गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. तो पोलिसांना शरण जाण्यासाठी उत्तरप्रदेशातही गेला होता. मात्र, त्यांनी नकार दिला. त्यानंतर आता पुणे पोलिसांनी त्याला जेरबंद केलं आहे. त्यांनी दावा केला आहे की, किरण गोसावी स्वत:हून शरण आला नसून आम्ही आम्हाला मिळालेल्या खबरीच्या आधारे त्याला अटक केली आहे.

 

पुणे पोलिसांनी गुरुवारी किरण गोसावीला ताब्यात घेतलं

  • रविवारी प्रभाकर साईल यांनी अनेक गौप्यस्फोट केले.
  • त्याच्या गौप्यस्फोटानंतर एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येऊ लागले.
  • त्यानंतर किरण गोसावीची एक व्हायरल क्लिप समोर आली होती.
  • यामध्ये तो लखनऊ पोलिसांना मला शरण यायचंय, असं म्हणत असल्याचं कळत होतं.
  • मात्र, उत्तर प्रदेश पोलिसांनी गोसावीला स्पष्टपणे नकार दिला.
  • त्यानंतर दोन दिवसांपूर्वी किरण गोसावीला ताब्यात घेण्यासाठी पुणे पोलिसांचं एक पथक लखनऊला रवाना झालं होता.
  • त्यानंतर गुरुवारी त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

काय म्हणाला किरण गोसावी?

  • त्याआधी किरण गोसावीने क्रुझवर कशा प्रकारे कारवाई केली होती आणि प्रभाकर साईलने केलेल्या आरोपांबाबत गौप्यस्फोट केला होता.
  • प्रभाकर साईल हा खोटं बोलत असून त्याचे सीडीआर अहवाल तपासावे, अशी माझी विनंती आहे.
  • माझे, प्रभाकर साईल व त्याच्या भावाचे सीडीआर व चॅट तपासावे सगळं सत्य समोर येईल, असं किरण गोसावी यांनं म्हटलं होतं.
  • तसंच, महाराष्ट्रातील एक मंत्री किंवा विरोधी पक्षातील एखाद्या तरी नेत्यांनं माझ्या बाजूने उभे राहावे.
  • त्यांनी मुंबई पोलिसांना सीडीआर व चॅट तपासण्याची विनंती करावी.
  • एकदा का अहवाल समोर आला की सगळं सत्य समोर येईल, असा दावा किरण गोसावीनं केला आहे.

किरण गोसावीवर तीन गुन्हे दाखल

  • किरण गोसावीवर आधीच विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
  • पुणे पोलीस त्याचा शोध घेत आहे.
  • पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवर तो फरार आरोपी आहे.
  • मलेशियातील हॉटेलमध्ये नोकरी लावतो म्हणून किरण गोसावी याने ३ लाख रूपये उकळल्याचा गुन्हा चिन्मय देशमुख यांनी २०१८ साली पुणे पोलिसात दाखल केला होता.
  • त्याच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी दोन पथक तयार केली होती.
  • किरण गोसावीवर ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यातही फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे तर तिसरा गुन्हा अंधेरीतील पोलीस ठाण्यात दाखल आहे.

Tags: kiran gosaviPrabhakar Sailpune policeUttar Pradeshउत्तर प्रदेशकिरण गोसावीपुणे पोलीसप्रभाकर साईल
Previous Post

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम सोलापूर) सोलापूरात १७४ जागांसाठी नोकरीची संधी

Next Post

पेट्रोल-डिझेलच्या दराचा पुन्हा भडका! महिनाभरात लिटरमागे सात ते साडेआठ रुपयांचा फटका!

Next Post
petrol diesel price hike

पेट्रोल-डिझेलच्या दराचा पुन्हा भडका! महिनाभरात लिटरमागे सात ते साडेआठ रुपयांचा फटका!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!