Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सोशल मीडियाची पॉझिटिव्ह पॉवर, ‘घे भरारी’ फेसबुक ग्रुपचे महिला व्यावसायिकांसाठी प्रदर्शन

चार दिवसीय 'घे भरारी' प्रदर्शन २८ पासून

October 26, 2021
in featured, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Women

मुक्तपीठ टीम

सोशल मीडियाची मोठी पॉझिटिव्ह पॉवर अनेकदा दिसत असते. त्यांची सकारात्मक घडवण्याची शक्ती मोठीच आहे. पुण्यातील छोट्या व महिला व्यावसायिकांना व्यासपीठ देण्यासाठी ‘घे भरारी’ फेसबुक ग्रुपतर्फे आयोजित चार दिवसीय ‘घे भरारी’ प्रदर्शन असाच एक उपक्रम आहे. या २८ ते ३१ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत हे प्रदर्शन डीपी रस्त्यावरील शुभारंभ लॉन्स येथे होत आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा माजी आमदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते गुरुवारी दुपारी १२ वाजता होणार आहे. रोज सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे, अशी माहिती संयोजक नीलम उमराणी-एदलाबादकर व राहुल कुलकर्णी यांनी दिली आहे.

 

राहुल कुलकर्णी म्हणाले, “व्यावसायिकांनी व्यावसायिकांसाठी चालवलेले हे व्यासपीठ आहे. अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि दर्जेदार उत्पादनाचे १५० पेक्षा जास्त स्टॉल आहेत. लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांसाठीच विविध वस्तू, खाद्यपदार्थ आणि मनोरंजाची मेजवानी असणार आहे. राष्ट्रीय पारितोषिक विजेता ‘मावळा’ हा रोमांचक गेम आणि मावळ्यांबरोबर सेल्फी हेही या प्रदर्शनाचे आकर्षण आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर, कोरोनानंतर होत असलेले हे प्रदर्शन सर्वांना सुखावणारे आहे.”

 

“महाराष्ट्रभरातून चवदार खाद्यपदार्थ, गृहसजावटीच्या वस्तू, हस्तकला, रेडिमेड, कोकणी पदार्थ, डिझायनर ड्रेसेस, हर्बल प्रॉडक्ट्स, आयुर्वेदिक औषधे, अत्तरे, परफ्युम, हॅण्डमेड दागिने, पेपर फिंलिंग फ्रिज मॅग्नेट, ऍक्रॅलिक गिफ्ट आर्टिकल, फ्रीज बॅग, सुंगधी उदबत्त्या, लाईट वेट पर्स, चंदेरी कलमकारी साड्या, आकर्षक नक्षीकाम केलेल्या ओढण्या, वेगवेळ्या चवीची सरबते, नाचणी, तीळ, शेंगदाण्याचे लाडू, उपवास खाकरा, लहानांसाठी खेळणी असतील,” असे नीलम उमराणी-एदलाबादकर यांनी नमूद केले.


Tags: Facebook groupGhe Bhararimuktpeethpunewomen entrepreneurswomen powerघे भरारीफेसबुक ग्रुपमहिला व्यावसायिकमुक्तपीठ
Previous Post

महाराष्ट्रातील भीमाशंकर, घृणेश्वरसह देशभरातील ज्योतिर्लिंगांना मिळणार उत्तराखंडमधून गंगाजल

Next Post

टाटा पॉवर-आयआयटी दिल्ली एकत्र, ईलेक्ट्रिक गाड्या,स्मार्ट ग्रिड तंत्रज्ञान, स्टार्टअप्ससाठी काम

Next Post
Tata Power-IIT Delhi

टाटा पॉवर-आयआयटी दिल्ली एकत्र, ईलेक्ट्रिक गाड्या,स्मार्ट ग्रिड तंत्रज्ञान, स्टार्टअप्ससाठी काम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!