मुक्तपीठ टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचा जन्मदाखल ट्विट करत समीर यांच्या वडिलांचे नाव दाऊद असल्याचे म्हटले होते. तसेच त्यांनी नोकरी मिळविण्यासाठी धर्म बदलल्याचा आरोप करताना त्यांचे जन्म प्रमाणपत्रच जाहीर केले होते. त्यानंतर हे आरोप समीर वानखेडे यांनी फेटाळून लावले असून वानखेडे यांनी पत्र लिहित नाराजी व्यक्त केली आहे.
काय म्हणाले समीर वानखेडे
- महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांच्या वैयक्तीक आरोपांमुळे मी दुःखी आहे.
- हे माझ्या कुटुंजच्या प्रायव्हसीचे उल्लंघन आहे, असे समीर वानखेडे म्हणाले.
- माझे वडील ज्ञानदेव कचरुजी वानखेडे हे राज्याच्या एक्साईज खात्यातून वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून निवृत्त झाले आहेत.
ते हिंदू होते. - माझी आई दिवंगत झहिदा ही मुस्लिम होती.
- मी बहुधर्मीय आणि धर्मनिरपेक्ष कुटुंबातील आहे, मला याचा अभिमान आहे.
- मी २००६ मध्ये डॉ. शबाना कुरेशी हिच्याशी कायदेशीररित्या विवाह केला होता.
- तसेच २०१६ मध्ये कायदेशीररित्या घटस्फोटही घेतला होता.
- २०१७ मध्ये मी क्रांती दिनानाथ रेडकर हिच्याशी विवाह केला.
- अशा प्रकारे सोशल मीडियावर माझे वैयक्तीक डॉक्युमेंट जाहीर करणे हे माझी आणि माझ्या कुटुंबाचा खासगीपणा धोक्यात आणण्यासारखे आहे.
- माझी माझ्या कुटुंबाची प्रतिमा मलिन करण्याचा यामागे उद्देश आहे.
- राज्याचे मंत्री माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर गेल्या काही दिवसांपासून मानसिक दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.
- याचे मला दुःख होत असल्याचे वानखेडे यांनी म्हटले आहे.
समीर वानखेडेंकडून मुंबईच्या एनडीपीस न्यायालयात प्रतिज्ञापत्र
- क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात सध्या बाहेर जो प्रकार सुरू आहे.
- त्याबाबत एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी मुंबई सत्र न्यायालयातील एनडीपीस न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे.
- न्यायाधीश वैभव पाटील यांच्या विशेष एनडीपीएस कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं.
- गुन्हा क्रमांक ९४/२१ बाबत चर्चा सुरू आहे. या गुन्ह्याबाबत समाज माध्यमावर सतत चर्चा सुरू आहे.
- अनेक पंचांची नावं उघड होत आहेत.
- एनसीबी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप होत आहेत.
- या पार्श्वभूमीवर न्यायालयाला माहिती देण्यात आली.
- या गुन्ह्याबाबत सोशल मीडियावर आणि ज्या काही तक्रारी होत आहेत, त्याचा परिणाम या गुन्ह्याच्या तपासावर होऊ नये, कारवाईवर होऊ नये.