Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“जावयाला गांजा प्रकरणात पकडताच मंत्री म्हणतात हर्बल तंबाखू, मग शेतकऱ्यांनाही ती लावायची परवानगी द्या!”

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सदाभाऊ खोतांच्या वक्तव्याचा सदर्भ देत आघाडीवर खोचक टीका

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
fadanvis vs malik

मुक्तपीठ टीम

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडमधील प्रचारसभेत बोलताना आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. एका मंत्र्याचा जावई गांजा विकताना आढळून आला. पण मंत्री म्हणतो की ती तर हर्बल तंबाखू आहे. मग आमचे सदाभाऊ खोत म्हणाले की आमच्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. कोणतेही पीक हाती लागत नाही. तुमचा मंत्री हर्बल तंबाखू पिकवू शकतो तर शेतकऱ्यांनाही हर्बल तंबाखू लावायची परवानगी द्या. म्हणजे शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील, असे त्यांनी नवाब मलिकांच्या जावयाच्या संदर्भात सुनावले.

 

…तर शेतकऱ्यांनाही हर्बल तंबाखू लावायची परवानगी द्या

  • देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार सुभाष साबणे यांच्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहेत.
  • यावेळी फडणवीस यांनी एका प्रचारसभेत बोलताना महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय.
  • एका मंत्र्याचा जावई गांजा विकताना आढळून आला.
  • पण मंत्री म्हणतो की ही हर्बल तंबाखू आहे.
  • मग आमचे सदाभाऊ खोत म्हणाले की आमच्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट आहे.
  • तुमचा मंत्री हर्बल तंबाखू पिकवू शकतो तर शेतकऱ्यांनाही हर्बल तंबाखू लावायची परवानगी द्या.
  • म्हणजे शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील, अशी खोचक टीका फडणवीस यांनी नवाब मलिकांवर केलीय.

 

या सरकारनं गरीबाला एकही घर दिलं नाही

  • खरं म्हणजे ही पोटनिवडणूक आली नसती तर बरं झालं असतं.
  • मात्र, ही निवडणूक आल्यावर या माध्यमातून इथल्या मतदारांना एक संधी मिळालीय.
  • राज्य सरकारच्या कामावर नापसंती व्यक्त करण्याची ही संधी मिळतेय.
  • या सरकारने २ वर्षात राज्यात केवळ भष्ट्राचार केला. प्रधानमंत्री आवास योजनेतून दहा लाख लोकांना घरं दिली.
  • गॅस सिलिंडर मिळालं पाहिजे.
  • पण या सरकारनं गरीबाला एकही घर दिलं नाही.
  • फक्त छपाई आणि पैसे कमावण्याचा उद्योग सुरु आहे.
  • आयकर खात्याच्या घाडीत हजारो कोटी सापडले आहेत.
  • ते जमा करताना सगळा हिशेबही ठेवलाय.

 

मतदान झालं की इथेही वीज कट करायला येतील

  • आमच्या काळात पाच वर्षात एकाही शेतकऱ्याचं वीज कनेक्शन कापलं नाही.
  • एकाही शेतकऱ्याची त्याबाबत तक्रार नाही.
  • मात्र, या सरकारमध्ये सर्रास वीज कापली जात आहे.
  • नांदेडमध्येही हे फक्त पोटनिवडणुकीसाठी थांबले आहेत.
  • एकदा पोटनिवडणूक होऊ द्या, मग इथेही वीज कट करायला येतील.
  • कोरोना काळात केंद्र सरकारनं मोठी मदत केली.
  • पण राज्य सरकारनं एका नव्या पैशाची मदत केली नाही.
  • मूठभर धन दांडग्या लोकांचं हे सरकार आहे.
  • मालदार, शेठ, सावकार लोकांचं हे सरकार आहे.

Tags: devendra fadnavisNawab MalikSadabhau Khotदेवेंद्र फडणवीसनवाब मलिकसदाभाऊ खोतहर्बल तंबाखू
Previous Post

बेघर झालेल्या गायिका कडूबाई खरात यांनी मिळाले हक्काचे घर!

Next Post

भारतात प्रजनन दरात बिहार नंबर १, उत्तरप्रदेशही मागोमाग! महाराष्ट्रासह दक्षिणेतील राज्यांमध्ये खूपच कमी!

Next Post
fertility rate

भारतात प्रजनन दरात बिहार नंबर १, उत्तरप्रदेशही मागोमाग! महाराष्ट्रासह दक्षिणेतील राज्यांमध्ये खूपच कमी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!