मुक्तपीठ टीम
क्रूझ पार्टी ड्रग्स प्रकरणात रोजच नव-नवीन गौप्यस्फोट होत आहेत. आतापर्यंत अभिनेते शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान आरोपी असलेल्या क्रुझ ड्रग पार्टी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनीच आघाडी उघडली होती. साक्षीदार प्रभाकर साईलने एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंवर १८ कोटींच्या लाचेचा आरोप केल्यानंतर एका व्हिडीओसह शिवसेना नेते संजय राऊतही आक्रमक झाले. आतापर्यंत मलिकांच्या आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले भाजपा नेते मोहित भारतीयच उत्तर देत होते. सामना त्यांच्यातच रंगलेला होता. आता मात्र मोहित भारतीयांनी संजय राऊत आणि त्यानंतर मलिक यांना दिलेल्या ट्वीट आव्हानामुळे काँग्रेसचे एक मंत्री महोदयही अडचणीत आले असल्याची चर्चा आहे. मोहित भारतीय यांनी थेट नाव घेतलं नसलं तरी त्यांना काँग्रेसचा हा मंत्रीच अभिप्रेत असल्याचे कळते.
सत्य ही जीतेगा !
सत्यमेव जयते ! @rautsanjay61 @PawarSpeaks @OfficeofUT @Dwalsepatil https://t.co/Ry7vFk18rU pic.twitter.com/1XkDt12gwh— Mohit Bharatiya ( Mohit Kamboj ) (@mohitbharatiya_) October 24, 2021
‘स्वतंत्र साक्षीदार’ प्रभाकर साईल याने रविवारी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कथितपणे फरार साक्षीदार केपी गोसावी मुंबईतील एनसीबी कार्यालयात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा ऑडिओ रेकॉर्ड करताना दिसत आहे. एनसीबीचा आर्यन खान प्रकरणातील साक्षीदार पंच प्रभाकर साईल यानं धक्कादायक आरोप केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटवर व्हिडीओ शेअर करुन चौकशीची मागणी केल. त्यानंतर भाजपा नेते आणि मलिकांच्या आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले भाजपा नेते मोहित भारतीय यांनी त्यांच्या ट्वीटला कोट करत आता हा व्हिडीओ आता डिलीट करु नका, असे आव्हान दिले. तसेच संजय राऊतांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओतील काळ्या कपड्यातील माणूस कोण आहे, कोणत्या पक्षाशी – राजकारणी – चित्रपट तारे – मंत्री यांचा संबंध आहे? याचे उत्तर द्यावे लागेल असे नवाब मलिकांनाही विचारले आहे. त्यानंतर मलिकांनी केंद्रीय मंत्री सोनोवाल हे जलवाहतूक आणि बंदरे खात्याचे मंत्री असल्याचे ट्वीट करताच मोहित भारतीय यांनी थेट “क्रुझवरील पार्टीची परवानगी दिली तरी कोणी”, असे विचारले आहे, असे स्पष्ट केले.
मैंने पूछा #Party की Permission किसने दी !
Ministry of Ports , Shipping , Waterways of India ka Minister का नाम नहीं ! @nawabmalikncp @ShelarAshish जी https://t.co/73qDBWc4EA
— Mohit Bharatiya ( Mohit Kamboj ) (@mohitbharatiya_) October 24, 2021
मुंबईतील राजकीय वर्तुळातील चर्चेनुसार मोहित भारतीय ज्यांच्याकडे बोट दाखवत आहेत ते मंत्री काँग्रेसचे आहेत. त्यांनी क्रुझवरील पार्टीसाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळवून देण्यासाठी आपल्या प्रभावाचा वापर केला आहे.