मुक्तपीठ टीम
शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शिवसेना नेते, मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सुचनेनुसार शिवसेना प्रणित महाराष्ट्र शिव माथाडी कामगार सेनेच्या अध्यक्षपदी निलेश भोसले यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेच्या पार पडलेल्या विशेष ठराव बैठकीत हा निर्णय आज जाहीर करण्यात आला. सदर संघटना ही राज्यभरातील असंख्य माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि त्यांना शासनाचे, संघटनेमार्फत विविध लाभ-सुविधा मिळवून देण्यासाठी सातत्याने कार्यरत असणारी संघटना असून संघटनेचे राज्यभरात सुमारे ७ हजार सभासद आहेत. यावेळी कार्याध्यक्ष कैलाश कणसे, सरचिटणीस संजय भोईटे, मोहन गोयल आणि संघटनेचे सर्व समिती सदस्य आदी पदाधिकारी उपस्थित होते.