Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार विजयी! ३१ पैकी २९ मते!!

६ हजारांपैकी फक्त ३४जणांनाच मताधिकारांच्या मुद्द्यावर आपचे पराभूत उमेदवार धनंजय शिंदे न्यायालयात जाणार

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Sharad Pawar 24-10-21

मुक्तपीठ टीम

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या प्रथमच गाजलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे अध्यक्षपदी निवडून आले आहेत, तर डॉ. भालचंद्र मुणगेकर उपाध्यक्षपदी निवडून आले आहेत. मताधिकार असलेल्या ३४पैकी ३१ मतदारांनी मतदान केले. श्री. पवार यांना मतदान झालेल्या एकूण ३१ मतांपैकी २९ मते मिळाली आहेत. शरद पवार यांच्या अध्यक्षपदासाठीच्या उमेदवारीविरोधात लढणारे आपचे नेते धनंजय शिंदे यांना फक्त २ मतांवर समाधान मानावे लागले आहे. या निवडणुकीत मताधिकार सहा हजार सदस्यांपैकी फक्त ३४ मतदारांनाच दिला गेल्याचा मुद्दा वादग्रस्त ठरला होता. अध्यक्षपदासाठी मतं मागणाऱ्या श्री. पवार आणि श्री. शिंदे या दोन्ही उमेदवारांना मताधिकार नव्हता! आपचे उमेदवार धनंजय शिंदे यांनी या प्रकरणी न्यायालयात धाव घेणार असल्याचे जाहीर केले आहे.

शरद पवारांच्या पॅनलमध्ये कोण होते?

दुसरीकडे मुंबई मराठी संग्रहालयाच्या अध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अर्ज दाखल केला आहे. तर एकूण सात उपाध्यक्ष पदांसाठी डॉ. भालचंद्र मुणगेकर, शशी प्रभू, रामदास फुटाणे , निवृत्त न्यायाधीश अरविंद सावंत हे प्रमुख दावेदार होते.

 

शरद पवारांच्या पॅनलविरोधात रिंगणात कोण होते?

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय बचाव समितीतर्फे या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी धनंजय शिंदे, उपाध्यक्ष पदासाठी डॉ संजय भिडे, प्रमोद खानोलकर, सुधीर सावंत, झुंझार पाटील, डॉ.रजनी जाधव, अनिल गलगली, आनंद प्रभू, संतोष कदम हे शरद पवार गटाविरोधात उभे होते.

 

आजवर अर्जही न करता नेमणुका, आपच्या धनंजय शिंदेंमुळे प्रथमच आव्हान!

डॉ. भालचंद्र मुणगेकर वगळता इतरांची नेमणूक शरद पवार यांच्या सूचनेनुसार २०१७ पासून वादग्रस्तरित्या झाली असून याबाबत अनिल गलगली यांनी केलेल्या तक्रारी अजून धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे प्रलंबित आहे. विशेष म्हणजे शरद पवार यांच्यापासून कोणीही यापूर्वी संग्रहालयाच्या निवडणूकीचा साधा अर्जही भरला नव्हता. या पार्श्वभूमीवर संग्रहालयाच्या गेल्या पन्नास वर्षांत प्रथमच कोणत्या या निवडणुकीत धनंजय शिंदे यांनी आव्हान उभे केले आहे. संग्रहालयाच्या सर्व सभासदांना घटनेप्रमाणे निवडणूकीत भाग घेण्याचा हक्क असूनही संग्रहालयाच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देऊन फक्त ३४ सभासदांना मतदानाचा अधिकार देऊन शरद पवार गटाच्या उमेदवारांच्या हाती संग्रहालयाची सूत्रे सोपवण्याचा घाट घातला आहे, असा आरोप शिंदे यांच्याकडून केला गेला होता.

 

सहा हजारांच्या संस्थेत ३४ जणांनाच मताधिकार!

  • मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाने जाहीर केलेल्या अध्यक्ष/उपाध्यक्ष पदासाठीच्या निवडणूकीत अनिल गलगली यांनी उपाध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
  • अनिल गलगली यांनी माघार घेताना अनेक महत्वाचे मुद्दे मांडले होते.
  • ही निवडणूक घटनेच्या नियम १०.१ प्रमाणे खुली निवडणूक व्हायला हवी. प्रत्येक सभासदाला मतदान करून अध्यक्ष/उपाध्यक्ष निवडून देण्याचा हक्क मिळायला हवा असे अनिल गलगली यांचे मत आहे.
  • यासाठी गलगली यांनी विनंती पत्र लिहून सर्व सभासदांना निवडणूकीबाबत माहिती देण्याची तसेच आवश्यक भासल्यास निवडणूक पुढे ढकलण्याची विनंती केली होती.
  • परंतु निवडणूक यंत्रणेनं गलगली यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले व सहा हजारांपेक्षा अधिक सभासदांऐवजी केवळ ३४ साधारण सभेवर निवडून आलेल्या सभासदांना मतदानाचा अधिकार देऊन निवडणूक घेतली गेली.
  • निवडणूक अधिकारी यांच्या या निर्णयाला कोणत्याही नियमाचा आधार नाही आणि निर्णयामुळे गलगली यांनी अर्ज मागे घेतला होता.


Tags: dhananjay shindemumbai marathi granth sangrahalaysharad pawarधनंजय शिंदेमुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयशरद पवार
Previous Post

“आर्यन खान प्रकरणात १८ कोटीत डील? कोऱ्या कागदावर साक्षीदारांच्या सह्या?”

Next Post

भारतीय स्टेट बँकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

Next Post
SBI

भारतीय स्टेट बँकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!