Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता माचिसही महागणार! १४ वर्षांनी एक रुपयाची दोन रुपये होणार!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
matchbox

मुक्तपीठ टीम

गेल्या १४ वर्षात केवळ एकच गोष्ट अशी आहे की जिचा भाव वाढला नाही, ती म्हणजे माचिस. महागाईचा भडका सातत्यानं उडालेला असतानाही माचिस होती त्याच किंमतीत मिळत राहते. पण आता १४ वर्षांनंतर माचिसच्या किमती वाढणार आहेत. ती १ रुपयांनी महाग होणार आहे. पुढील महिन्यापासुन माचिस २ रुपयांना मिळणार आहे. पाच प्रमुख माचिस उद्योग संस्थांच्या प्रतिनिधींनी एकमताने आगपेटीची MRP १ रुपये वरून २ रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

१ डिसेंबरपासून हा नियम लागू केला जाणार आहे. २००७ मध्ये माचिसच्या किमतीत शेवटच्या वेळी सुधारणा करण्यात आली होती, जेव्हा त्याची किंमत ५० पैशांवरून १ रुपये करण्यात आली होती. शिवकाशी येथील ऑल इंडिया चेंबर ऑफ मॅचेसच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत किमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

माचिससाठीचा कच्चा माल भडकला

  • कच्च्या मालाच्या किमतीत झालेल्या अलीकडच्या वाढीमुळे माचिस भाववाढ अपरिहार्य आहे.
  • माचिस तयार करण्यासाठी १४ कच्च्या मालाची आवश्यकता असते. उत्पादकांनी सांगितले. १
  • एक किलो लाल फॉस्फरस ४२५ रुपयांवरून ८१० रुपयांवर पोहोचला आहे.
  • तसेच मेणाची पेटी ५८ रुपयांवरून ८० रुपये, बाहेरची पेटी फळी ३६ रुपयांवरून ५५ रुपये आणि आतील पेटीची फळी ३२ रुपयांवरून ५८ रुपयांवर पोहोचली आहे.
  • कागद, स्प्लिंट, पोटॅशियम क्लोरेट आणि सल्फरच्या किमतीही १० ऑक्टोबरपासून वाढल्या आहेत.
  • डिझेलच्या वाढत्या किमतींनीही या भारात भर पडली आहे.

 

आता ६०० माचिसचे बंडल २७०-३०० रुपयांना विकले जात आहे. नॅशनल स्मॉल मॅचबॉक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे सचिव व्ही.एस. सेतुराथायनम यांनी सांगितले की, “उत्पादक ६०० माचिस बॉक्सचे बंडल (प्रत्येक बॉक्समध्ये ५० मॅचबॉक्स) २७० ते ३०० रुपयांना विकत आहेत. आम्ही आमच्या युनिटमधून विक्री किंमत ६०% ने वाढवून ४३०-४८० रुपये प्रति बंडल करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये १२% जीएसटी आणि वाहतुकीचा खर्च समाविष्ट नाही.”


Tags: matchboxऑल इंडिया चेंबर ऑफ मॅचेसनॅशनल स्मॉल मॅचबॉक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन
Previous Post

आधी जिल्हा बँक…आता सातारचं स्टेडियम…उदयनराजे पवारांवर का संतापलेत?

Next Post

गृहमंत्री अमित शाहंचं मिशन काश्मीर! तीन दिवस काश्मिरातच मुक्काम! दहशत संपवण्यासाठी प्रयत्न!!

Next Post
amit shah

गृहमंत्री अमित शाहंचं मिशन काश्मीर! तीन दिवस काश्मिरातच मुक्काम! दहशत संपवण्यासाठी प्रयत्न!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!