Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अंबाजोगाईचे काँग्रेस नेते राजकिशोर मोदी यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

"राजकिशोर मोदी यांच्या प्रवेशाने बीड जिल्हयात राष्ट्रवादी काँग्रेस अधिक बळकट होईल": अजित पवार

October 22, 2021
in घडलं-बिघडलं
0
NCP

मुक्तपीठ टीम

बीड जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व अंबाजोगाई नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजकिशोर (पापा) मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार असून अंबाजोगाई नगर पालिकेसह केज विधानसभेतही पक्ष एकहाती विजय मिळवेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजकिशोर मोदी यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला.

राजकिशोर मोदी यांच्यासह त्यांचे अनेक सहकारी व पदाधिकारी तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील मनसेचे जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी मुंबई येथील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला आहे. नव्याने पक्षप्रवेश झालेले पापा मोदी व त्यांच्या सहकाऱ्यांची विचारसरणी देखील समान आहे. त्यामुळे पक्षाच्या वाईट काळात सोबत राहिलेल्या जुन्या कार्यकर्त्यांवर कोणताही अन्याय होऊ न देता, जुने व नवे अशा सर्वांनाच सोबत घेऊन जिल्ह्यात एकजुटीने पक्षावाढीसाठी काम करू असे आवाहन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी केले.

यावेळी कार्यक्रमाला पक्षाचे आमदार सतीश चव्हाण, आमदार संजय दौंड, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार बाळासाहेब आजबे, प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील, माजी आमदार पृथ्वीराज साठे, माजी आमदार सय्यद सलीम, माजी आमदार राजेंद्र जगताप, माजी आमदार संजय वाघचौरे, माजी आमदार अमरसिंह पंडित, बीड जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, डॉक्टर्स सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, राजेसाहेब चव्हाण, शिवाजी सिरसाट, युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, भाऊसाहेब तरमळे तसेच राजकिशोर मोदी व विजय चव्हाण यांच्यासमवेत प्रवेश केलेले सर्व सहकारी, पदाधिकारी उपस्थित होते.


Tags: ajit pawarbeedDhananjay MundeNCPअजित पवारअंबाजोगाई नगरपरिषदजंयत पाटीलधनंजय मुंडेराजकिशोर (पापा) मोदीराष्ट्रवादी काँग्रेससंजय बनसोडे
Previous Post

“वाढत्या महागाईविरोधात काँग्रेसचे १४ ते २९ नोव्हेंबरदरम्यान राज्यव्यापी आंदोलन, ‘जेलभरो’ही करणार!”: नाना पटोले

Next Post

“दुग्धजन्य आणि इतर अन्नपदार्थांत भेसळ करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करावी”: डॉ. राजेंद्र शिंगणे

Next Post
rajendra shingane

"दुग्धजन्य आणि इतर अन्नपदार्थांत भेसळ करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करावी": डॉ. राजेंद्र शिंगणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!