Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

उरलेलं अन्न वाया जाण्यापासून वाचवत गरजूंची भूक भागवणारी रोटी बँक!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
roti bank

मुक्तपीठ टीम 

मुंबईसह जगभरात रोजच छोटे मोठे कार्यक्रम होतात. त्यात आलेल्यांसाठी जेवणाचीही सोय केली जाते. आलेल्यांना अन्न कमी पडू नये म्हणून जास्तच बनवले जाते. अनेकदा ते इतके जास्त उरते की फेकून देण्याची वेळ येते. त्याचवेळी एक मोठा वर्ग पुरेशा अन्नापासून वंचित भुकेला झोपतो. ही दरी भरून काढण्याची कल्पना मुंबईतील सुभाष तळेकरांच्या डोक्यात आली. आपण अन्न वाया घालवितो पण तेच अन्न कोणाचं तरी पोट भरु शकतं, एकदम साधा पण मोठा विचार सुभाष तळेकर यांनी २९ डिंसेबर २०१५ला गंगाराम तळेकर यांचे पहील्या पुण्यतिथी निमित्त मांडला. त्यातून आकारास आली रोटी बँक.

 

जगाची एकूण लोकसंख्या ७०० कोटी आहे. त्यापैकी ११ टक्के लोक म्हणजेच ७९ कोटी ५० लाख लोक पुरेशा अन्नापासून वंचित भुकेले असतात. अमेरिका, इंडोनेशिया आणि ब्राझिल या जगातील लोकसंख्येच्या दृष्टीने अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर असणाऱ्या देशांच्या एकूण लोकसंख्येएवढे लोक जगात उपाशी असतात. यापैकी भारतात उपाशी राहणाऱ्यांची संख्या तब्बल १९ कोटी ५० लाख एवढी आहे. म्हणजेच २० लाख लोक आणखी मिळवून अख्खा पकिस्तान देश उपाशी राहील एवढी ही प्रचंड संख्या आहे. भारतात दररोज ३ हजार मुले कुपोषणाने मरतात.

 

मुंबईत या पेक्षा वेगळी स्थिती नाही. एका बाजुला नवकोट नारायणांच्या मोठ मोठ्या पार्ट्या,विवाह सोहळे होत होते या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात अतिरीक्त जेवण बनवले जाते. पार्टी संपली की मग हे अतिरीक्त जेवण कचऱ्याच्या डब्यात फेकून दिले जात असे. हे चित्र एका बाजूला असते तर दुसऱ्या बाजूला याच मुंबईत उपाशी पोटी फुटपाथवर झोपणार्यांची संख्या लक्षणयरीत्या मोठी आहे. काही ठिकाणी तर गरीब अनाथ मुले कचऱ्याच्या डब्यातून फेकलेले अन्न वेचून खात असतात.

 

या परिस्थितीला बदलण्यासाठी सुभाष तळेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला आणी रोटी बॅंकेची स्थापना केली. त्यांनी मुंबईकरांना आवाहन केले की आपल्या येथे असे अतिरिक्त अन्न शिल्लक रहात असेल तर ते अन्न फेकू नका. आम्हाला तुम्ही फोन करा. फोन केल्या नंतर आमची माणसं आपल्याकडे सायकलवरून येतील व आपले अतिरिक्त जेवण त्या परिसरातील भुकेल्यांना वाटतील. या आवाहनाला मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला. शिल्लक राहिलेले अन्न घेऊन जा असे सांगणारे २० ते २५ फोन दररोज येतात. शनिवार व रविवारी तर हा आकडा ४० ते ५० च्या घरात जातो. अशा प्रकारे दररोज सरासरी ३०० लोकांना अन्न वाटले जाते. शनिवार रविवार असेल तर सरासरी ६०० लोकांना अन्न वाटले जाते. भुकेल्यांची भूक भागविण्याचं स्तुत्य काम सुभाष तळेकर व त्यांचे डबेवाले सहकारी करत आहेत. या रोटीबॅकेच्या माध्यमातून सहा वर्षात २ कोटी रूपयाचे अन्न वाया जाण्यापासून वाचवले गेले आहे.

 

  • आपल्या घरी एखादा लग्न समारंभ वा कार्यक्रम असला की खूप अन्न उरतं. या अन्नाचं करायचं काय असा प्रश्न आपल्याला पडत
  • असेलच. आता असा प्रश्न पडला तर थेट रोटी बँकेला 9867221310 या क्रमांकावर फोन करा.
  • कोरोना संकटा काळातही रोटी बँकेने रस्त्यावरील अनेकांची भूक भागवली आहे.
  • सध्याच्या परिस्थितीमुळे रोटीबॅकेच्या कामावरही परिणाम झाला आहे. सध्या दक्षिण मुंबईतच विशिष्ठ वेळेतच रोटीबँकेचे काम केले जाते. लवकरच ते पुन्हा आणखी जास्त भुकेल्यांच्या मुखी अन्नाचे घास पोहचवत वाया जाण्यापासूनही वाचवेल.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: gangaram talekarmumbaiRoti banksubhash talekarगंगाराम तळेकरमुंबईरोटी बॅंकेसुभाष तळेकर
Previous Post

राज्यात १,५७३ नवे रुग्ण, २,९६८ रुग्ण बरे! मुंबईत राज्याच्या जवळपास २५% नवे रुग्ण!!

Next Post

मुंबईत रेल्वेचं ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’…लवकरच आणखी दोन ठिकाणी शानदार…चवदार सेवा!

Next Post
train

मुंबईत रेल्वेचं ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’...लवकरच आणखी दोन ठिकाणी शानदार...चवदार सेवा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!