Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गुहागर नगराध्यक्षांचा समर्थकांसह राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

October 21, 2021
in घडलं-बिघडलं
0
Guhagar Rajesh Bendal joins ncp

मुक्तपीठ टीम

महाविकास आघाडीच्या माध्यमातून कोकणचा विकास करण्याची आमची भूमिका आहे असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडले. गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेश बेंडल ,माजी उपनगराध्यक्षा स्नेहा बागडे, प्रदीप बेंडल यांनी आपल्या समर्थकांसह आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
आजच्या पक्षप्रवेशामुळे नवे चेहरे आपल्याला मिळाले आहेत. जुन्या- नव्या नेत्यांचा योग्य समन्वय घडवून पक्ष वाढीचे काम आपल्याला करायचे आहे असे आवाहनही अजित पवार यांनी केले.

Guhagar Rajesh Bendal joins ncp-2

कोकणात आर्थिक सुबत्ता यावी यासाठी आदरणीय पवारसाहेबांनी अनेक निर्णय घेतले. कोकण रेल्वे होण्यासाठी पवारसाहेबांनी पुढाकार घेतला. साहेबांचे कोकणावर अपार प्रेम आहे. कोकणाचा कुठलाही प्रश्न आला तर कोकणवासियांना सहकार्याची भावना ठेवा अशी पवारसाहेबांची आम्हाला सूचना असते असेही अजित पवार म्हणाले.
कोकणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट झाला पाहिजे, असा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. यापुढे चिपळूण , दापोली, गुहागर या पट्ट्यातील अनेक नेते, कार्यकर्ते पक्षात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.
राष्ट्रवादी हा पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना न्याय देण्याची आमची भूमिका असते. पुढील आठवड्यात राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा कोकणात येणार आहे. त्यावेळी कोकणातील कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करु असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
आजच्या पक्षप्रवेशामुळे गुहागर, चिपळूण भागात राष्ट्रवादीची ताकद नक्कीच वाढेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.
कुणबी समाज संघाच्या पदाधिकाऱ्यांनी काही दिवसापूर्वी आदरणीय पवारसाहेबांची भेट घेतली होती. अनेक वर्ष कुणबी समाजाचे नेतृत्व करुनही अनेक नेत्यांनी समाजासाठी काहीच केले नव्हते. मात्र साहेबांची भेट घेतल्यानंतर साहेबांनी समाजाला आश्वस्त केले शिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुलुंड येथे कुणबी समाजाच्या वसतीगृहासाठी पाच कोटींचा निधी दिल्याचेही खासदार सुनिल तटकरे यांनी आवर्जून सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार सुनिल तटकरे,राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: ajit pawarguhagarNCPrajesh bendalअजित पवारगुहागरराजेश बेंडलराष्ट्रवादी काँग्रेस
Previous Post

शाहरुखच्या मुलानंतर आता चंकीची मुलगी अनन्या पांडे एनसीबीच्या फेऱ्यात!

Next Post

पुढील वर्षी कच्चे तेल शंभरी पार, पेट्रोल, डिझेल १० रुपयांनी महागणार?

Next Post
crude oil

पुढील वर्षी कच्चे तेल शंभरी पार, पेट्रोल, डिझेल १० रुपयांनी महागणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!