मुक्तपीठ टीम
आजवर फक्त चीननेच साध्य केलेले १०० कोटी कोरोना लसींच्या डोस देण्याचा आकडा आता भारतानेही पार केला आहे. सकाळी पावणे दहाच्या सुमारास कोरोना लसीच्या १०० कोटी डोस देण्याचा टप्पा गाठला. भारताने एक नवा इतिहास रचला आहे. सोळा जानेवारीपासून देशात कोरोना लसीकरण सुरू झाले आणि दहा महिन्यात १०० कोटी डोस दिले गेले.
शंभर कोटींपैकी शेवटचे वीस कोटी डोस हे शेवटच्या ३१ दिवसांमध्ये दिले गेले आहेत. शंभर कोटींचा टप्पा गाठताच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीतील राम मनोहर लोहिया (आरएमएल) रुग्णालयात पोहोचले. तेथे त्यांनी सुमारे 20 मिनिटे आरोग्यसेवकांशी चर्चा केली. त्यांचं अभिनंदन करत त्यांना प्रोत्साहन दिले.
India creates HISTORY!
Congratulations INDIA for crossing historic milestone of #100crore #COVID19 vaccination!
It wouldn’t have been possible without our great leader.Thank you Hon PM @narendramodi ji!
Sincere gratitude to healthcare teams for humongous efforts!#VaccineCentury pic.twitter.com/LgTqfkm2GL— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 21, 2021
शंभर कोटी डोस, सरकारची मोठी तयारी!
- लसीचे १०० कोटी डोस पूर्ण करण्याची घोषणा करण्यासाठी सरकारने खास तयारी केली आहे.
- यासाठी ट्रेन, विमाने आणि जहाजांवर खास उद्घोषणा केल्या जात आहेत.
- लसीकरणचे १०० टक्के लक्ष्य पूर्ण केलेल्या ठिकाणी स्थानिक आरोग्य सेवकांचे फलक झळकवत अभिनंदन केले गेले आहे.
शंभर कोटी डोस, आरोग्य सेवकांचे चौफेर कौतुक!
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील राम मनोहर लोहिया (आरएमएल) रुग्णालयातील आरोग्य सेवकांशी संवाद साधला.
- केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आज १०० कोटी डोस साजरा करण्यासाठी गीत आणि लघुपट प्रकाशित करणार आहेत.
- हा कार्यक्रम लाल किल्ल्यावर दुपारी १२.३० वाजता सुरु होणार आहे.
- सुप्रसिद्ध गायका कैलाश खेर यांच्या आवाजतील या गाण्याचा टिझर काही दिवसांपूर्वीच प्रकाशित झाला आहे.
- तब्बल चौदाशे किलो वजनाचा देशातील सर्वात मोठा तिरंगा लाल किल्ल्यावर लावण्यात येण्याची शक्यता आहे.
— Rajesh Tope (@rajeshtope11) October 20, 2021
कसा गाठला शंभर कोटींचा टप्पा?
- देशात लसीकरण मोहीम १६ जानेवारीपासून सुरू झाली.
- सुरुवातीचे २० कोटी डोस देण्यासाठी १३१ दिवस लागले.
- त्यानंतरचे २० कोटी डोस ५२ दिवसात देण्यात आले.
- त्यापुढील ६० कोटींचा टप्पा ३९ दिवसात पार केला गेला.
- त्यानंतर २० कोटी डोस देत ८० कोटींचा टप्पा २४ दिवसात पूर्ण केला गेला.
- त्यानंतर ३१ दिवसांमध्ये २० कोटी डोस देत शंभर कोटींचा टप्पा आज गाठला गेला.
- एका अंदाजानुसार, सध्याच्या वेगानुसार लसीकरणाचा २१६ कोटी डोसचा टप्पा गाठण्यासाठी १७५ दिवसांचा कालावधी लागू शकतो.