Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय निवडणूक: शरद पवारांविरुद्ध लढणाऱ्या धनंजय शिंदेंनाच मताधिकार नाही!

निवडणूक नियमबाह्य असल्याने रद्द करण्याची मागणी!

October 20, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
sp & App

मुक्तपीठ टीम

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय या संस्थेच्या अध्यक्षपदाचा अर्ज दाखल केलाय, पण मलाच मतदानाचा अधिकार नाही, असा खळबळजनक दावा आपचे नेते आणि या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आव्हान देण्यासाठी उभे ठाकलेले धनंजय शिंदे यांनी केला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांना विनंत्या व करून देखील सर्व उमेदवार व सुमारे ६००० जणांच्या मतदानाचा हक्क डावलून फक्त ३४ जणांनाच अधिकार दिला गेलाय. वारंवार तक्रारी करूनही संस्थेतील सर्व नामवंत शांत बसले आहेत, असेही ते म्हणालेत.

 

सदस्य ६ हजार, मताधिकार फक्त ३४ जणांनाच का?

  • मुंबई मराठी ग्रंथालयाच्या निवडणुकीचा वाद उफाळला आहे.
  • आता अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत किती सदस्यांना मतदानाचा अधिकार आहे यावरून नवा वाद निर्माण झाला आहे.
  • निवडणुकीत सहा हजारांपेक्षा अधिक मतदारांऐवजी फक्त ३४ मतदारांनाच मतदानाचा अधिकार का, असा सवाल करत आरटीआय कार्यकर्ते आणि संस्थेचे आजीव सभासद अनिल गलगली यांनी धर्मादाय आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे.

 

कोणत्याही नियम, घटनेचा आधार नसलेला मर्यादितांनाच मताधिकार!

  • मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदांच्या निवडणुकीसंदर्भात ५ ऑक्टोबर रोजी निवडणूक अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने परिपत्रक निघाले आहे.
  • या परिपत्रकात अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार फक्त साधारण सभेवर निवडून आलेल्या ३४ सभासदांना आहे.
  • असे नमूद करण्यात आले आहे.
  • या मर्यादित सदस्यांच्या मताधिकाराला कोणत्याही नियमांचा आधार नाही.
  • संस्थेच्या घटना व नियमावलीत साधारण सभेचे सदस्य अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडतील, असे कुठेही नमूद केलेले नाही.
  • उलट घटना व नियमावलीतील कलम १० (१) मध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडून देण्याचा उमेदवार म्हणून निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार आश्रयदाता, सहायक, उपकर्ता, आजीव, सन्माननीय सभासद वा वर्गातील सभासदांना आहे, असे स्पष्ट म्हटले आहे.
  • माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी याच नियमांवर बोट ठेवत तक्रार केली आहे.

 

निवडणूक नियमबाह्य असल्याने रद्द करण्याची मागणी!

  • ही निवडणूक खुली होऊन संग्रहालयाच्या सर्व शाखांमध्ये असलेल्या सभासदांना मतदानासाठी अधिकार मिळाला पाहिजे.
  • तोपर्यंत ही नियमबाह्य निवडणूक रद्द करणे संयुक्तिक ठरेल.
  • या प्रकरणी न्यायालयात धाव घेण्याचा इशाराही अनिल गलगली यांनी दिला आहे.

Tags: dhananjay shindesharad pawarधनंजय शिंदेमुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयशरद पवार
Previous Post

कोणाच्याही दबावात न येता अनधिकृत बांधकामांवर युद्ध पातळीवर कारवाईचे मुख्यमंत्री ठाकरेंचे आदेश

Next Post

आघाडी सरकारविरोधात ‘रिपाइं’ची तीव्र निदर्शने

Next Post
RPI2

आघाडी सरकारविरोधात 'रिपाइं'ची तीव्र निदर्शने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!