मुक्तपीठ टीम
भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्या आरोपांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. साताऱ्यातील राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी अजित पवारांकडे सोमय्यांना बघून घेण्यासाठी परवानगी मागितली आहे. तर त्याच साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्याच्या प्रकरणात सोमय्या आज साताऱ्यातील शेतकऱ्यांसोबत ईडीकडे जात आहेत. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना थेट प्रश्न विचारला आहे, “अजित पवारांनी सांगावे, जरंडेश्वर साखर कारखाना शेतकऱ्यांकडून खासगी ताब्यात घेण्याच्या प्रकरणातील ‘गुरु कमोडीटीज’च्या नावातील ‘गुरु’ कोण?” त्यामुळे हा संघर्ष वाढतच जाणार असल्याचे चित्र आहे.
किरीट सोमय्यांनी अजित पवारांना ‘गुरु’बद्दल विचारले!
- अजित पवारांना एक प्रश्न: तुम्ही जरंडेश्वर साखर कारखाना ताब्यात घेततला. गुरु कमोडिटीजकडून घेतला. त्यातील गुरु जे आहे त्यांच्याशी तुमचा संबंध आहे का?
- साखर कारखाने कसे ताब्यात घ्यायचे याची गुरुकिल्ली शरद पवारांकडे आहे.
- २७ हजार शेतकऱ्यांचा साखर कारखाना अजित पवारांनी ताब्यात घेतला.
- त्यामुळे अजित पवारांनीच सांगावं गुरू कोण आहे.
Myself alongwith Founder Farmers of Jarandeshwar Sugar met ED Officials. Submitted Documents of Ajit Pawar Scam.
Few NCP Gundas tried to Obstruct…
We will fight for
“Ghotala Mukt Maharashtra” pic.twitter.com/CzNym41Fk0
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) October 20, 2021
जरंडेश्वर, पवार आणि सोमय्या
- जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथे आहे.
- हा कारखाना २०१०मध्ये ६५ कोटी ७५ लाख रुपयांना विकण्यात आला होता.
- त्यावेळी तो निम्म्या किंमतीत विकण्यात आल्याचा आरोप झाला.
- याच काळात अजित पवार हे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर होते.
- हा कारखाना त्यानंतर मेसर्स गुरू कमोडिटी सर्व्हिसेस प्रा. लि यांच्या मालकीचा झाला.
- हा कारखाना सध्या मेसर्स जरेंडेश्वर शुगर मिल प्रा लिमिटेडकडे आहे.
- मेसर्स जरडेश्वर प्रा. लिमिटेड कंपनीत मेसर्स स्पार्कलिंग सॉईल प्रा. लिमिटेड कंपनी ही कंपनी भागीदार आहे. स्पार्कलिंग कंपनी ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित असल्याचा आरोप आहे.
- गुरू कमोडिटी कंपनी बनावट असल्याचा ईडीच्या अधिकाऱ्यांना संशय आहे.
- जरंडेश्वर शुगर मिल प्रा लि. ने पुणे जिल्हा कॉ ऑप बँकेकडून सुमारे ७०० कोटी रुपये कर्ज घेतलेले आहे.