मुक्तपीठ टीम
केवळ ग्रंथविक्री हे उद्दिष्ट न ठेवता एकूण वाचनाविषयी आवड निर्माण करणे, वाचनसंस्कृतीचे संवर्धन या उद्दिष्टानं वाचन जागर अभियान चालवले जाते. या अभियानाअंतर्गत महाराष्ट्रातील नामवंत अकरा प्रकाशकांनी याआधी तीन ग्रंथमहोत्सव महाराष्ट्रभरात भरवले आहेत आणि त्याला रसिक वाचकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला आहे. आधी झालेल्या ग्रंथमहोत्सवांपेक्षाही या वर्षीचा ग्रंथमहोत्सव अधिक व्यापक, अधिक ग्रंथांसह भरवला जाणार आहे.
ज्या समाजाचा प्रवास वाचाल तर समृद्ध व्हाल या प्रगत जाणिवेपर्यंत होतो, त्या समाजाची सांस्कृतिक समृद्धी नक्की असते हे तर सर्वज्ञात आहे. असा सजग समृद्ध समाज निर्माण करण्यासाठी महाराष्ट्रभरातील उत्तम साहित्यनिर्मितीसाठी कटिबद्ध असलेले नामवंत प्रकाशक, यांनी एकत्र येऊन वाचन जागर अभियान सुरू केले आहे.
वाचन जागर दसरा-दिवाळी महोत्सव
- एकूण अकरा प्रकाशक सहभागी
- प्रत्येकाची ५० निवडक पुस्तकं, एकूण ५५० पुस्तकं.
- योजनेचा कालावधी १५ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर २०२१.ग्राहकांना खरेदीवर छापील किमतीवर २५% सूट.३५ दुकानं योजनेत सहभागी
- ग्राहकांना निवडलेल्या ५५० पुस्तकांच्या प्रकाशनवार याद्या प्रकाशकांकडे अथवा
- दुकानदारांकडे मिळतील
- फेसबुक पेज www.facebook.com/VachanJagar
वाचन जागर मोहिमेत सहभाग
- मेहता पब्लिशिंग हाऊस
- मनोविकास प्रकाशन
- रोहन प्रकाशन
- डायमंड पब्लिकेशन
- ज्योत्स्ना प्रकाशन
- मॅजेस्टिक प्रकाशन
- साकेत प्रकाशन
- साधना प्रकाशन
- पॉप्युलर प्रकाशन
- राजहंस प्रकाशन
- पद्मगंधा प्रकाशन