मुक्तपीठ टीम
भारत सरकारने सर्व नागरिकांना जारी केलेले आधार कार्ड आजच्या काळात महत्वाचे ओळखपत्र आहे. ऑनलाईन डाऊनलोड म्हणजेच ई आधार कार्ड आता उपलब्ध होणार आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) द्वारे जारी केलेल्या आधार कार्डवर एक अद्वितीय बारा अंकी संख्या छापली जाते. इंडिया पोस्ट कडुन मिळणारे आधार कार्ड आणि यूआयडीएआयच्या वेबसाइटवरून डाऊनलोड केलेले ई-आधार तितकेच वैध आहेत. ई-आधार कार्ड हे तुमच्या नियमित आधार कार्डचे इलेक्ट्रॉनिक रूप आहे. वेरीफीकेशनसाठी आधार कार्डऐवजी ई आधारकार्ड देखील वापरले जाऊ शकते.
ई-आधार कार्डमध्ये नाव, जन्मतारीख, आधार कार्ड, छायाचित्र आणि बायोमेट्रिक डेटा सारखी सर्व आवश्यक माहिती असेल. आधार कार्ड ऑनलाईन डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
आधार कार्ड ऑनलाईन कसे डाउनलोड करावे?
- आधार https://uidai.gov.in/ च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- माय आधार मेनूमधून डाउनलोड पर्याय निवडा.
- https://eaadhaar.uidai.gov.in/ या लिंकवर थेट भेट दिली जाऊ शकते.
- येथे आधार, एनरोलमेंट आयडी आणि व्हर्च्युअल आयडी असे तीन पर्याय दिसतील.
- तुमच्याकडे आधार कार्ड क्रमांक असल्यास आधार पर्याय निवडा.
- येथे १२ अंकी आधार क्रमांक टाकावा लागेल.
- पडताळणीसाठी कॅप्चा कोड एंटर करा आणि सेंड ओटीपी पर्यायावर क्लिक करा.
- नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर पाठवलेला ओटीपी प्रविष्ट करा.
- आता व्हेरिफाय अँड डाउनलोड या पर्यायावर क्लिक करा.
- तुमच्या डिव्हाइसवर ई-आधार डाउनलोड केले जाईल.
आधार कार्डच्या डाउनलोड केलेल्या फाईलचा पासवर्ड ८ अक्षरांचा असेल. आधार कार्डमध्ये दिलेल्या नावाची पहिली चार अक्षरे आणि नंतर जन्म वर्ष लिहावे लागेल.