Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ठाकरेंच्या दसऱ्याच्या हल्ल्यावर फडणवीसांचा प्रतिहल्ला! व्हायचं नव्हतं मग देसाई-शिंदे-रावतेंना का मुख्यमंत्री केले नाही?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Fadanvis-thacakrey

मुक्तपीठ टीम

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदावरून चांगलंच सुनावलं होतं. अपेक्षेप्रमाणेच विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना उत्तर दिलं आहे. ठाकरेंच्या मुख्यमंत्री व्हायचंच नव्हतं, या विधानावर फडणवीसांनी, जर तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तर मग शिवसेनेतील सुभाष देसाई, एकनाथ शिंदे आणि दिवाकर रावते यांना मुख्यमंत्री का नाही केलं? असा सवाल केला आहे. तसेच जर तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तर नारायण राणे आणि राज ठाकरे शिवसेना सोडून का गेले असाही प्रश्न त्यांनी ठाकरेंना विचारला आहे.

 

फडणवीसांचं ठाकरेंना उत्तर…

  • उद्धव ठाकरेंनी भाबडेपणाचा मुखवटा उतरवला पाहिजे.
  • मुख्यमंत्रीपदाची त्यांची महत्त्वकांक्षा होती ती त्यांनी पूर्ण केली.
  • त्याला उगाच तत्वज्ञानाची जोड देत आहेत. ते त्यांनी थांबवावं.
  • शिवसेनाप्रमुखांना दिलेला शब्दच पाळायचा होता तर सुभाष देसाई, दिवाकर रावते एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायचं होतं.
  • मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तर नारायण राणेंना पक्षातून का बाहेर जावं लागलं?
    राणेंना तर पक्षप्रमुख व्हायचं नव्हतं.
  • राज ठाकरेंना पक्षातून का जावं लागलं? त्यामुळे दोष देणं थांबवा.
  • आता दोन वर्ष झाले आहेत. किती दिवस तेच तेच बोलणार.
  • राजकारणात महत्त्वकांक्षा असणं गैर नाही. पण त्याला तत्वज्ञानाची जोड देणं कितपत योग्य आहे?

शिवसेनेला जनतेनं नाकारलं!

  • शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात विचाराचं सोनं लुटलं जायचं. पण काल गरळ ओकताना पाहिलं.
  • जनतेने भाजपाला नाकारलेलं नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला नाकारलं.
    शिवसेनेला वरपास केलं याचं त्यांना विस्मरण झालं आहे.
  • आम्ही ७० टक्के जागा जिंकल्या. तुम्ही ४५ टक्के जागा जिंकल्या.
    तुम्हाला जनतेने नाकारलं.
  • हे बेईमानीने तयार झालेलं सरकार आहे.

शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब आहे, तोपर्यंत महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही!

  • मुख्यमंत्री म्हणाले महाराष्ट्राचा बंगाल करायचा आहे. यूनियनबाजी आणि खंडणीने बंगालमध्ये एकही उद्योग टिकला नाही.
  • कोलकाताची आजची व्यवस्था काय आहे हे माहीत आहे का?
  • जो तुमच्या विरोधात बोलेल त्याचं मुंडकं छाटून त्याला फासावर लटकावयाचं आहे का?
  • जोपर्यंत आमच्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब आहे, तोपर्यंत महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही.
  • जोपर्यंत भाजप जिवंत आहे, तोपर्यंत महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही.
    काय वाटेल ते करू पण महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही!

Tags: BJPchief minister uddhav thackeraydevendra fadanvisShivsenaएकनाथ शिंदेदसरा मेळावादिवाकर रावतेमहाराष्ट्रसुभाष देसाई
Previous Post

भारतीय अन्न महामंडळात (एफसीआय) वॉचमन पदाच्या ८६० जागांसाठी नोकरीची संधी

Next Post

एनसीपीचे नवाब मलिक एनसीबीचे गैरप्रकार रोज उघडे पाडणार! ट्वीटच्या माध्यमातून हल्लाबोल करणार!!

Next Post
nawab mailk

एनसीपीचे नवाब मलिक एनसीबीचे गैरप्रकार रोज उघडे पाडणार! ट्वीटच्या माध्यमातून हल्लाबोल करणार!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!