मुक्तपीठ टीम
विजयादशमीच्या पवित्र उत्सवाचे औचित्य साधत संरक्षण मंत्रालयाच्या विशेष कार्यक्रमात सात संरक्षण कंपन्यांचे राष्ट्रार्पण करण्यात आले आहे. या विशेष सोहळ्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून प्रसारित केला जाणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री आणि संरक्षण उद्योगांचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
सात नव्या संरक्षण कंपन्या!
- केंद्र सरकारने आयुध निर्माणी मंडळाचे १०० टक्के सरकारी मालकीच्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये रुपांतर केले आहे.
- आपली संरक्षण सज्जता वाढवण्यासाठी, देशाला संरक्षण उत्पादन क्षेत्रात, आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
- या निर्णयामुळे संरक्षण उत्पादन निर्मिती क्षेत्रातील कार्यान्वयन स्वायत्तता वाढवली जाईल, कार्यक्षमताही वाढेल आणि विकास तसेच नवोन्मेषाच्या नव्या संधी उपलब्ध होतील.
संरक्षण क्षेत्रातील सात नव्या सरकारी कंपन्या
१. म्युनिशन्स इंडिया लिमिटेड (MIL)
२. आर्मर्ड व्हेईकल्स निगम लिमिटेड (AVANI)
३. ॲडव्हान्स्ड वेपन्स अँड इक्विपमेंट इंडिया लिमिटेड (AWE India)
४ट्रूप कम्फर्ट लिमिटेड (TCL)
५. यंत्र इंडिया लिमिटेड (YIL)
६. इंडिया ओप्टेल लिमिटेड (IOL)
७. ग्लाईडर्स इंडिया लिमिटेड (GIL)
पंतप्रधान मोदींचे भाषण
पंतप्रधान मोदींनी सात DPSUS ला राष्ट्राला समर्पित केले. या दरम्यान, पंतप्रधान मोदी म्हणाले की, ७ नवीन कंपन्या जे आज संरक्षण क्षेत्रात प्रवेश करणार आहेत, ते सक्षम राष्ट्राचा त्यांचा संकल्प आणखी मजबूत करतील. या दरम्यान, आज विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर, राष्ट्राला सशक्त करण्यासाठी, राष्ट्राला अजय बनवण्यासाठी, जे दिवस -रात्र एक करत आहेत,त्यांच्या सामर्थ्यात आणखी आधुनिकता आणण्याच्या दिशेने जाण्याची संधी, आणि तीही विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर एक शुभसंकेतच मानली पाहिजे..
पंतप्रधान मोदी म्हणाले की, या वर्षी भारताने स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात प्रवेश केला आहे. स्वातंत्र्याच्या या अमृतमहोत्सवी वर्षात, देश नवीन भविष्य घडवण्यासाठी नवीन संकल्प घेत आहे आणि दशके अडकलेली कामे पूर्ण करत आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, ४१ ऑर्डिनन्स फॅक्टरीजचे नूतनीकरण करण्याचा निर्णय, ७ नवीन कंपन्यांचा शुभारंभ हा देशाच्या या संकल्प प्रवासाचा एक भाग आहे. हा निर्णय गेल्या १५-२० वर्षांपासून प्रलंबित होता. मला विश्वास आहे की, या सर्व सात कंपन्या येत्या काळात भारताच्या लष्करी सामर्थ्याचा प्रमुख आधार बनतील. जागतिक युद्धाच्या वेळी भारताच्या आयुध कारखान्यांची ताकद जगाने पाहिली आहे. आमच्याकडे उत्तम संसाधने, जागतिक दर्जाची कौशल्ये असायची. स्वातंत्र्यानंतर आपल्याला हे कारखाने अपग्रेड करण्याची, नवीन युगाचे तंत्रज्ञान स्वीकारण्याची गरज होती. पण त्याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, स्वावलंबी भारत मोहिमेअंतर्गत भारताला स्वतःची जगातील सर्वात मोठी लष्करी शक्ती बनवणे आणि भारतातील आधुनिक लष्करी उद्योगाचा विकास करणे हे देशाचे ध्येय आहे. गेल्या सात वर्षांत देशाने ‘मेक इन इंडिया’च्या मंत्राने हा संकल्प पुढे नेण्याचे काम केले आहे. आज देशाच्या संरक्षण क्षेत्रात पूर्वीपेक्षा अधिक पारदर्शकता, विश्वास आणि तंत्रज्ञान आधारित दृष्टिकोन आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच, आपल्या संरक्षण क्षेत्रात इतक्या मोठ्या सुधारणा होत आहेत, स्थिर धोरणांऐवजी सिंगल विंडो सिस्टीमची व्यवस्था करण्यात आली आहे.
पीएम मोदी पुढे म्हणाले की काही काळापूर्वी संरक्षण मंत्रालयाने अशा १०० पेक्षा जास्त रणनीतिक उपकरणांची यादी जारी केली होती जी आता बाहेरून आयात केली जाणार नाही. देशाने या नवीन कंपन्यांसाठी ६५,००० कोटी रुपयांचे ऑर्डर आधीच दिले आहेत. यावरून आपल्या संरक्षण उद्योगावर देशाचा विश्वास दिसून येतो.
पंतप्रधान मोदी म्हणाले की आज माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम साहब यांची जयंती आहे.
संरक्षण मंत्रालयाने २८ सप्टेंबर रोजी आदेश जारी केला की १ ऑक्टोबरपासून आयुध निर्माणी मंडळ रद्द करण्यात आले आहे आणि ७ नवीन कंपन्या स्थापन करण्यात आल्या आहेत.