मुक्तपीठ टीम
गेले काही दिवस होणारी कुजबुज काँग्रेस नेते कबिल सिब्बल यांनी उघडपणे मांडली आहे. आर्यन ड्रग्स प्रकरणाची सगळीकडे चर्चा सुरू झाल्यामुळे उत्तरप्रदेशीतील लखीमपूर खेरीमधील शेतकरी हत्याकांडाकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यांनी स्पष्ट शब्दात भावना मांडल्या, “शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अंमली पदार्थांच्या प्रकरणामुळे लखीमपूर खेरीतील मंत्र्याच्या मुलाच्या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले जात आहे. ते म्हणाले की, आर्यनच्या प्रकरणात ड्रग्स सापडले नाहीत त्याचबरोबर त्यांचा गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही, तरीही त्याला दोषी ठरवण्यात आले.
सिब्बल यांनी ट्वीट करत म्हटलं की, ‘आर्यन खान प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच एनसीबीच्या तपासात कायद्याची एक नवीन प्रणाली समोर आली आहे. ड्रग्स घेण्याचा किंवा त्यावरच्या ताब्याचा कोणताही पुरावा सापडला नाही, तरीही निर्दोष सिद्ध झाल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले आहे. लखीमपूर खेरी येथील आशिष मिश्रा प्रकरणापासून लक्ष वळवले गेले आहे.” अशी माहिती त्यांनी दिली.
Aryan Khan
Narcotics Control Bureau investigationNew Jurisprudence:
No evidence of :
consumption
possessionGuilty till proven innocent
Attention successfully diverted from Ashish 𝐌𝐢𝐬𝐡𝐫𝐚 ( Lakhimpur Kheri )
— Kapil Sibal (@KapilSibal) October 15, 2021
यानंतरही काँग्रेस नेते सिब्बल इथेच थांबले नाहीत. त्यांनी उपरोधिक शब्दात पंतप्रधान मोदींनाही लक्ष्य केले ते म्हणाले, ‘भूक आणि गरिबी संपल्याबद्दल मोदीजींचे अभिनंदन. आता भारत डिजिटल अर्थव्यवस्था म्हणून जागतिक शक्ती बनला आहे. गेल्या वर्षीच्या ९४ व्या स्थानाच्या तुलनेत ग्लोबल हंगर इंडेक्सच्या यादीत १०१ व्या क्रमांकावर आहे. बांगलादेश नेपाळ, पाकिस्तानच्याही मागे आहे.
लखीमपूर प्रकरणात सिब्बल यांचे पंतप्रधानांना प्रश्न
- यापूर्वी कपिल सिब्बल यांनी लखीमपूर खेरी हत्याकांडावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
- ‘लखीमपूर खेरीची भयानक घटना. मोदीजी, तुम्ही गप्प का? आपल्या बाजूने फक्त सहानुभूतीचा एक शब्द आवश्यक आहे. ते अवघड नसावे.’
- काँग्रेस नेत्याने हा प्रश्नही विचारला, ‘तुम्ही विरोधी पक्षात असता तर तुम्ही कशी प्रतिक्रिया दिली असती? कृपया आम्हाला सांगा.’